मुंबई, 9 फेब्रुवारी : मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई- अहमदाबाद ट्रेनला मुंबई उच्च न्यायालयाचा ग्रीन सिग्नल मिळाला आहे. तर दुसरीकडे गोदरेजला कोणताही दिलासा देण्यास न्यायालयानं नकार दिला आहे. विक्रोळीतील जमीन अधिग्रहनाबाबत गोदरेजच्या वतीनं दाखल करण्यात आलेली याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे. विक्रोळीतील जमीन अधिकग्रहणाबाबत राज्य सरकारचा निर्णय योग्य असल्यचं हाय कोर्टानं म्हटलं आहे.
हाय कोर्टाने काय म्हटलं?
हाय कोर्टाच्या निर्णयामुळे मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा झाला आहे. विक्रोळीतील जमिनीबाबत गोदरेजच्या वतीनं दाखल करण्यात आलेली याचिका हाय कोर्टाने फेटाळून लावली आहे. तसेच निकालाला दोन आठवडे स्थगिती देण्याची मागणी देखील न्यायालयानं फेटाळून लावली आहे.
विक्रोळीतील जमीन अधिग्रहणाबाबत राज्य सरकारचा निर्णय योग्य आहे. हा केंद्र सरकारचा बहुउद्देशीय आणि लोकपयोगी प्रकल्प आहे. या विवादामुळे आधीच प्रकल्पाला बराच उशिर झाला आहे, तो आणखीन वाढवणं योग्य नाही. गोदरेजनं जमीन अधिग्रहनाबाबत केला दावा मान्य करता येणार नाही असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
हेही वाचा : मुंबई, ठाणे प्रवास होणार वेगवान; वाढदिवशी मुख्यमंत्र्यांचं ठाणेकरांना मोठं गिफ्ट
बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा
दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयामुळे मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग मोकळा झाला असून, राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयानं गोदरेजची याचिका फेटाळून लावली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.