आजी-नातवाचं नातं खास, पण आई-बाबांची जागा कुणी घेऊ शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय

Grandma bond with grandchild special but not replace biological parents: मुंबई उच्च न्यायालयाने नाशिकच्या या आजीबाईंच्या 12 वर्षीय नातवाची कस्टडी त्याच्या आईवडिलांकडे सोपवली आहे.

Grandma bond with grandchild special but not replace biological parents: मुंबई उच्च न्यायालयाने नाशिकच्या या आजीबाईंच्या 12 वर्षीय नातवाची कस्टडी त्याच्या आईवडिलांकडे सोपवली आहे.

  • Share this:
    मुंबई, 04 मार्च: आजी आणि नातवाचं नातं एकप्रकारे खास नातं असतं. असं असलं तरीही हे नातं त्याच्या आईवडिलांच्या नात्याची जागा घेऊ शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्चन्यायालयाने (Bombay High Court) दिला. बुधवारी नाशिकच्या एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला. यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने नाशिकच्या या आजीबाईंच्या 12 वर्षीय नातवाची कस्टडी त्याच्या आईवडिलांकडे सोपवली आहे. या आईवडिलांनी वर्षाच्या सुरुवातील हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. या मुलाच्या आईची आई असणारी ही आजी आणि या मुलामध्ये एक छान केमिस्ट्री होती. त्यामुळे आजीने त्याला त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्यास नकार दिला होता. त्यांनी अशी माहिती दिली की मुलाची आई आजारी असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना बेडरेस्टची सूचना दिली होती. परिणामी 2019 मध्ये आई आणि मुलगा तिच्या माहेरी आईकडे नाशिकमध्ये येऊन राहू लागले. (हे वाचा-या महिलेनं फेसबुकवर का पोस्ट केला टॉयलेटमधला खासगी फोटो?) मुलाचं शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरता त्याला नाशिकमधील शाळेत दाखल करण्यात आलं होतं. शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये हे मायलेक पुण्यामध्ये परतण्यास तयार झाले होते, तेवढ्यात कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन लागू करण्यात आला. मे 2020 मध्ये ही महिला पुण्यात परतली पण तिचा मुलगा नाशिकमध्येच होता. पुण्यातील एका इंटरनॅशनल स्कुलमध्ये त्याचं नाव दाखल करण्यात आलं होतं आणि त्याचे ऑनलाइन क्लासेस सुरू होते. (हे वाचा-मूड खराब आहे? मग या पाच गोष्टी नक्की कराच! लगेच मूड होईल ठीक!) कालांतराने सर्व सुरळीत झाल्यानंतर त्याच्या आई-वडिलांनी मुलाला परत आणण्यासाठी नाशिक गाठले. पण आजीबाईंना नातवाला देण्यास नकार दिला. आजींनी पोलीस आणि चाइल्ड वेलफेअर कमिटीशी संपर्क करून अशी माहिती दिली की या नवरा-बायकोमध्ये वैवाहिक वाद आहेत. याचा परिणाम 12 वर्षीय मुलावर होत आहे. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेलं होतं. न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि मनीष पिटाले यांचा समावेश असलेल्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आई-वडिलांच्या बाजूने निर्णय दिला आहे. कोर्टाने यावेळी असे म्हटले की, 'मुलाचे सामान्य सुख, समाधानीपणा, आरोग्य, शिक्षण, शारीरिक, नैतिक आणि बौद्धिक विकास, संगोपन आणि कल्याण तसेच त्याचे भविष्य नक्कीच त्याच्या पालकांवर अवलंबून असते.' हायकोर्टाने असा निर्णय देण्यात आणखी एक बाब कारणीभूत ठरली ती म्हणजे मुलाचे वडील एका मल्टिनॅशनल कंपनीत वरिष्ठ पदावर इलेक्ट्रिकल इंजिनिअर होते, तर आजी शिकलेली दिसत नव्हती आणि त्यांची आर्थिक परिस्थितीही ठीक दिसत नव्हती.
    Published by:Manoj Khandekar
    First published: