मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नाशिकमध्ये प्रख्यात बिल्डराच्या घराबाहेर आढळली बॉम्ब सदृश्य वस्तू

नाशिकमध्ये प्रख्यात बिल्डराच्या घराबाहेर आढळली बॉम्ब सदृश्य वस्तू

एक टेनिस बॉल आढळून आला आहे. या बॉलमध्ये फटाक्यांची गन पावडर भरली होती.

एक टेनिस बॉल आढळून आला आहे. या बॉलमध्ये फटाक्यांची गन पावडर भरली होती.

एक टेनिस बॉल आढळून आला आहे. या बॉलमध्ये फटाक्यांची गन पावडर भरली होती.

नाशिक, 02 मार्च : मुंबईतील  पेडर रोड (Peddar Road) परिसरात एका रस्त्यावर उभ्या केलेल्या गाडीत जिलेटिनच्या 20 कांड्या सापडल्यानं (Gelatin explosives in Mumbai ) खळबळ उडाली होती. त्यानंतर आता नाशिकमधील प्रख्यात बिल्डर जीतूभाई ठक्कर यांच्या घराबाहेर बॉम्ब सदृश्य वस्तू सापडण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

नाशिकमधील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या कॉलेज रोडच्या लिंक रस्त्यावर बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली. त्यामुळे पोलीस आणि बॉम्ब नाशक पथकांनी घटनास्थळी धाव घेतली.

मोदींव्यतिरिक्त अमेरिका, इस्राईलसह कोणत्या देशांच्या नेत्यांनी घेतलीये लस?

बॉम्ब शोधक, नाशक पथकानं स्फोटक सदृश्य वस्तू नष्ट केल्यानंतर त्या खोक्यामधून एक प्लास्टिकचा लहान चेंडू आणि त्यामध्ये भरलेली फटाक्याची दारू आणि त्याला लावलेली वात अशा स्वरूपात होती.

या बॉम्ब सदृश्य वस्तूमध्ये कुठल्याही प्रकारचे धातू किंवा स्फोटक मिश्रित घटक नसल्याचा खुलासा बॉम्ब शोधक व नाशक पथकाने केला आहे.

जगभरात कोरोना रुग्णांचा आकडा 11.49 कोटींच्या पार! वाचा काय आहे WHO चा इशारा

जेथे ही वस्तू सापडली तेथे अनेक व्यापारी संकुलं आणि प्रतिष्ठितांचे बंगले असलेला हा परिसर आहे. पोलिसांची मोठी कुमक घटनास्थळी दाखल झाली तसेच बीडीडीएस पथक पोहोचलं आणि हा पूर्ण परिसर सील करण्यात आला होता. कचरा गोळा करणाऱ्यांना ही वस्तू सापडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच हे कोणतंही मॉक ड्रिल नसल्याचा पोलिसांनी खुलासा केला.

First published:

Tags: Mumbai, Nashik