मालेगावात लक्झरी बसमध्ये बॉम्ब.. निनावी फोनमुळे पोलिसांची धावपळ

मालेगावात लक्झरी बसमध्ये बॉम्ब.. निनावी फोनमुळे पोलिसांची धावपळ

बसमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. पथकाने क्लिअरचा रिपोर्ट दिल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला. अकरा वाजता सुरतला सुटणारी गाडी दोन वाजेपर्यंत खोळंबली होती.

  • Share this:

बब्बू शेख, (प्रतिनिधी)

मनमाड, 17 ऑगस्ट- मालेगाव येथून सुरतला जाणाऱ्या लक्झरी बसमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याच्या निनावी फोनमुळे पोलिस प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. सना ट्रॅव्हल्सची ही बस होती. प्रवासी बसल्यानंतर बस निघण्याच्या तयारीत असतानाच सना ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमध्ये शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास एक निनावी फोन आला. बसमध्ये स्फोटके ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

सना ट्रॅव्हल्सच्या संचालकाने तत्काळ पोलिसांना माहिती दिली. उपअधीक्षक रत्नाकर नवले पोलिस पथकासह किदवाई रस्ता चौकात दाखल झाले. बॉम्बशोधक पथक काही वेळात पोहोचले. बारा वाजता वाहनातील प्रवाशांचे सर्व साहित्य खाली काढून बीडीडीएस पथकाने तपासणी केली. परंतु कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. पथकाने क्लिअरचा रिपोर्ट दिल्यानंतर सर्वांचा जीव भांड्यात पडला. अकरा वाजता सुरतला सुटणारी गाडी दोन वाजेपर्यंत खोळंबली होती. पोसिलांनी दिलेली माहिती अशी की, मालेगाव शहरात ट्रॅव्हल्समध्ये स्फोटके असल्याचा निनावी फोन पोलिस प्रशासनाला आला. सना ट्रॅव्हल्सच्या (जीजे-05- झेड-2071) वाहनामध्ये बॉम्ब असल्याचे समजताच बॉम्ब शोधक पथकाने कसून तपासणी केली.

दुसरी बसही सोनगडजवळ थांबवली..

सना ट्रॅव्हल्सची दुसरी बसही मालेगावकडे येत असल्याचे सांगण्यात आले. ही बस सोनगड (गुजरात) परिसरात मार्गावर होती. सुरक्षेच्या कारणास्तव ती ही थांबविण्यात येऊन जवळच्या पोलिस ठाण्याला सुचित करण्याच्या सूचना केल्याचे सूत्रांनी सांगितले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन उपाधिक्षक रत्नाकर नवले यांनी केले.

एसटी बससाठी विद्यार्थी उतरले रस्त्यावर..

अधिकृतपणे थांबा असताना बस थांबविण्यात येत नसल्याने उमराणे पंचक्रोशीतील शेकडो संतप्त विद्यार्थी, पालक व गावकऱ्यांनी मुंबई-आग्रा मार्गावर शनिवारी रस्ता रोको केला. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक एक तासापेक्षा जास्त वेळ ठप्प झाली होती. अखेर एसटी महामंडळ व संबंधित अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. उमराणेसह इतर गावातील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी मालेगाव, चांदवड, मनमाड यासह इतर ठिकाणी जातात. मात्र, एसटी चालक बस थांबवित नसल्याने या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. वारंवार मागणी करून, निवेदने देऊन देखील एसटी थांबत नसल्याचे पाहून अखेर शनिवारी विद्यार्थी रस्त्यावर उतरले व त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

पुण्यात बाप्पाच्या आगमनासाठी ढोल-ताशे सज्ज, पाहा सरावाचा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 17, 2019 02:29 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading