चेन्नई एक्स्प्रेस पनवेलमध्ये येताच स्फोट होणार, मुंबई पोलिसांना निनावी फोन

चेन्नई एक्स्प्रेस पनवेलमध्ये येताच स्फोट होणार, मुंबई पोलिसांना निनावी फोन

दुपारी अडीच वाजता चेन्नई एक्सप्रेस ही ट्रेन पनवेलला येताच ट्रेनमध्ये स्फोट होईल, असं या फोनवरुन सांगण्यात आलं आहे.

  • Share this:

मुंबई, 21 ऑक्टोबर :  दहशतवादी संघटना 'लष्कर ए तोयबा'ने चेन्नई एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब ठेवला आहे, अशा आशयाचा एक निनावी फोन मुंबई पोलिसांना आला आहे. दुपारी अडीच वाजता चेन्नई एक्स्प्रेस ही ट्रेन पनवेलला येताच ट्रेनमध्ये स्फोट होईल, असं या फोनवरुन सांगण्यात आलं आहे.

या निनावी फोननंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. हा फोन नक्की कुणी केला आणि खरंच असा काही स्फोट करण्याचा डाव आहे का, याबाबत आता पोलीस अधिक तपास करत आहेत. 'लष्कर एक तोबया'ने भारतात याआधीही अनेकदा घातपात घडवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या संघटनेसंंबंधित हा फोन असल्याने, पोलिसांकडूनही गांभीर्याने याबाबत तपास केला जात आहे.

दरम्यान, सणांच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ल्याची ही धमकी आली आहे. सणासुदीच्या काळात वातावरण बिघडू नये, यासाठी येणाऱ्या काळात पोलीस यंत्रणेला आता सुरक्षेच्या दृष्टीने मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे.

VIDEO : सावधान! सोशल मीडियावरच्या नोकरीच्या जाहिरातीमुळे होऊ शकते लाखोंची फसवणूक

First published: October 21, 2018, 2:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading