• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • कोल्हापूरमध्ये गावठी बॉम्बने हॉस्पिटल उडवण्याचा प्रयत्न, शहरात खळबळ

कोल्हापूरमध्ये गावठी बॉम्बने हॉस्पिटल उडवण्याचा प्रयत्न, शहरात खळबळ

Kolhapur : एका कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे कोल्हापूर पोलिसांनी हा कट उधळून लावला आहे.

  • Share this:
कोल्हापूर, 21 मार्च : महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये आढळलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि स्कॉर्पिओ गाडीचं प्रकरण ताजं असतानाच दक्षिण महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur District) असाच एक गंभीर आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूरमध्ये गावठी बॉम्बने हॉस्पिटल उडवून लावण्याचा कट (A bomb was found at the hospital) रचण्यात आला होता, मात्र एका कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे कोल्हापूर पोलिसांनी हा कट उधळून लावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर शहरातील डॉ.सतिश पाटील यांचे पायोस हॉस्पिटल गावठी बॉम्बने उडवून लावण्याचा कट जयसिंगपूर पोलिसांनी उधळून लावला. ही घटना आज दुपारी घडली. जयसिंगपूर पोलीस आणि कोल्हापूर बॉम्बशोध आणि नाशक पथकाच्या अथक प्रयत्नानंतर सदरचा गावठी बॉम्ब निकामी केल्यानंतर शहरवासीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेमुळे जयसिंगपूर शहरात खळबळ माजली आहे. सांगली-कोल्हापूर मार्गावर डॉ.सतिश पाटील यांचे पायोस हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलच्या कंपाऊड लगत गुरुवारपासून बेवारस अवस्थेत प्लॉस्टिकच्या पोत्यामध्ये काही साहित्य पडून होते. मात्र, सेक्युरिटी गार्डने सदरचे साहित्य पेशंटच्या नातेवाईकांचे असेल म्हणून दुर्लक्ष केले होते. आज सकाळी हॉस्पिटमधील भरत पाटील या कर्मचार्‍याच्या हे साहित्य असलेल्या पोत्यात टिक-टिक आवाज आला. हेही वाचा - 'Sorry Friends...' व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवत 19 वर्षीय तरुणाने घेतला गळफास यामुळे त्याने तपासले असता आतमध्ये प्लॉस्टिकच्या पाईप, वायर, आणि इलेक्ट्रॉनिक सर्किटसारखे साहित्य आढळून आले. तर या पोत्यामधून बराच अंतरापर्यंत एक केबल पडलेली लक्षात आली. याबाबतची माहिती पाटील यांनी तात्काळ डॉ.सतिश पाटील यांच्या कानावर घालून जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगड्डे यांना कळवली. त्यानंतर काही वेळातच कोल्हापूरहून बॉम्ब शोध व नाशक पथक, ठसे तज्ञ, श्वान पथक असा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. याबाबतची माहिती शहरात वार्‍यासारखी पसरली. हॉटेल शॉमवी व झेले पंपाच्या नजीक बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, या घटनेमुळे जयसिंगपूर शहरासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांकडून अधिक तपास सुरु करण्यात आला आहे. हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज पोलीस ताब्यात घेणार असून नेमकं कोणत्या उद्देशाने हा गावठी बॉम्ब ठेवण्यात आला होता याचाही तपास करण्याचे एक आव्हान आता कोल्हापूर पोलिसांसमोर असणार आहे.
Published by:Akshay Shitole
First published: