धुळे, 5 मे- नवीन देवपूर येथील दत्त मंदिर परिसरातील स्वामी नारायण मंदिर बॉम्बने उडवून देण्याच्या धमकी खळबळ उडाली आहे. मंदिराच्या टपाल पेटीत हिंदी भाषेतील दोन निनावी पत्रे शनिवारी सायंकाळी आढळून आली. या पार्श्वभूमीवर मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
मंदिराच्या टपाल पेटीत धमकी देणारे हिंदी भाषेतील दोन निनावी पत्रे सापडल्याची माहिती मंदिर प्रशासनाने जिल्हा पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांना दिली. त्यांनी याबाबत दखल घेत मंदिर परिसराला भेट देऊन सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले. उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी मंदिर परिसराची पाहणी करून आढावा घेतला. मंदिर परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची तपासणी करुनच मंदिरात प्रवेश देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. धमकीच्या सखोल चौकशी पोलिस प्रशासन करत आहे.
VIDEO: पुण्यात ड्रेनेजची पाईपलाईन फुटली, रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम