5 महिन्यांच्या बाळाकडे लक्ष देता येत नाहीए... साराचे 'FB Live'द्वारे स्पष्टीकरण

5 महिन्यांच्या बाळाकडे लक्ष देता येत नाहीए... साराचे 'FB Live'द्वारे स्पष्टीकरण

अभिनेत्री सारा श्रवण हिने फेसबुक लाईव्हद्वारे आपल्या चाहत्यांशी संवाद साधला आहे.

  • Share this:

मुंबई,2 डिसेंबर: 'रोल नंबर 18’ या चित्रपटातील अभिनेत्याविरोधात कटकारस्थान करुन त्याच्याकडून खंडणी उकळल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री सारा श्रवण हिला पुणे पोलिसांनी मुंबईतून रविवारी अटक केली होती. तिला पोलिसांनी कोर्टात हजर केले असता 15 हजारांच्या जात मुचलक्यावर आणि देश न सोडण्याच्या अटीवर तिची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

साराचे 'FB Live'द्वारे स्पष्टीकरण

जामिनावर सुटका झाल्यानंतर अभिनेत्री सारा श्रवण हिने फेसबुक लाईव्हद्वारे आपल्या चाहत्यांशी संवाद साधला आहे. 'कोणत्याही गोष्टींवर विश्वास ठेवू नका..याचा मला फार मनस्ताप झाला असून यामुळे मला माझ्या 5 महिन्यांच्या बाळाकडे नीट लक्ष देता येत नाहीए..असे सारा हिने 'फेसबुक लाईव्ह'द्वारे स्पष्टीकरण दिले आहे.

'या' अभिनेत्याविरूद्ध केली विनयभंगाची खोटी तक्रार

अभिनेता सुभाष यादवविरूद्ध कटकारस्ठान करून विनयभंगाची खोटी तक्रार देऊन ती मागे घेण्यासाठी मोठी खंडणी उकळल्याची सारा हिच्यावर आरोप आहे. पुणे जिल्हा व सत्र कोर्टाने सारा हिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर क्राईम ब्रॅंचने तिला अटक केली होती.

काय आहे हे प्रकरण?

'रोल नंबर 18' या सिनेमाचा अभिनेता सुभाष दत्तात्रय यादव (रा. गुलमोहर सोसायटी, शास्त्री रोड, पुणे) यांच्यावर 'रोल नंबर 18' मध्ये काम केलेली अभिनेत्री रोहिणी माने हिने वॉशरूममध्ये छेड काढल्याचा आरोप केला होता. एवढेच नाही तर यादवविरुद्ध पोलिसांत विनयभंगाची तक्रारही दाखल केली होती. हा प्रकार 28 सप्टेंबर 2018 रोजी सहकार नगर येथे घडला होता. याकामात रोहिणीला साराने मदत केली. नंतर या दोघींनी सुभाष यादव यास ब्लॅकमेल केले. सुभाष यादव यांनी 15 लाख रुपयांची खंडणी मागितले. काही रक्कम घेतल्यानंतर उर्वरित रक्कम मिळत नसल्याने बदनामी करण्यासाठी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

मात्र, हे आपल्याविरोधात कटकारस्थान असल्याचे लक्षात येताच सुभाष यादव यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दिली होती. सुभाष यादव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रोहिणी माने हिच्यासह सारा श्रवण हिच्याविरुद्ध सहकार नगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी अभिनेत्री रोहिणी माने (रा.दहिटना, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद), गुंड राम भरत जगदाळे (रा. पुणे) या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. परंतु, अभिनेत्री सारा ही दुबईला पसार झाली होती. अभिनेत्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून त्याला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी उपनिरीक्षक अमोल टेकाळे याला निलंबित करण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 2, 2019 03:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading