अभिनेत्री पायल रोहतगीचे पुन्हा एकदा वादग्रस्त ट्वीट..जितेंद्र आव्हाडांनी केला हा आरोप
महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी हिने पुन्हा एकदा वादग्रस्त ट्वीट केले आहे. पायलने आती हिंदुत्वाबाबत ट्वीट केले आहे.
मुंबई, 03 जून- महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी हिने पुन्हा एकदा वादग्रस्त ट्वीट केले आहे. पायलने आती हिंदुत्वाबाबत ट्वीट केले आहे. मागील अनेक दिवसांपासून ती वादग्रस्त वक्तव्यांनी सोशल मीडियावर चर्चेत आहे.
— PAYAL ROHATGI & Team -BHAKTS of BHAGWAN RAM (@Payal_Rohatgi) June 3, 2019
जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला सवाल
प्रसिद्धीच्या हव्यासापोटी पायल ही सोशल मीडियावर उलटसुलट पोस्ट करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. यावर पोलीस काय कारवाई करणार, असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
आत्मविश्वासच आणतोय तिला अडचणीत..
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त ट्वीटवर काहींनी पायलचे कौतुक केले तर काहींना तिच्यावर कडाडून टीका केली आहे. पायलने आपला मुद्दा ठामपणे मांडला आहे. परंतु आता तिचा हाच आत्मविश्वास तिला अडचणीत आणताना दिसत आहे. पायलने शिवाजी महाराज हे मुळचे क्षत्रिय नसून ते शुद्र जातीत जन्माला आले होते, असे ट्वीट तिने करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. ट्विटर, इन्स्टाग्रामवर तिने स्वतःचा आणि पती संग्राम सिंगचे फोटो शेअर करत छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तसेच महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण का दिले, असा सवालही तिने केला आहे.
दरम्यान, नाव नथुराम गोडसेची पाठराखण केलेल्या व्हिडिओमुळे पायल सुरुवातीला चर्चेत आली होती. तिने कमल यांच्या वक्तव्याचा समाचार घेत, कमल यांना म्हातारचळ लागल्याचे म्हटले होते. तिने आपला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत 'कमल यांना दहशतवाद आणि खून याच्यातला फरक कळत नाही. स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी गोडसे नसून जिना होते,' असे म्हटले होते.
VIDEO:आदित्य ठाकरे विधानसभा लढवण्याची चर्चा, भाजपची पहिली प्रतिक्रिया