'मुंबईची इटली होणार', बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीने व्यक्त केली भीती, उद्धव ठाकरेंवरही सडकून टीका

'मुंबईची इटली होणार', बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीने व्यक्त केली भीती, उद्धव ठाकरेंवरही सडकून टीका

राज्य सरकारवर भाजपकडून टीका करण्यात येत होती. त्यानंतर आता या वादात बॉलिवूड अभिनेत्रीच्या बहिणीनेही उडी घेतली आहे.

  • Share this:

मुंबई, 15 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रात असलेल्या परराज्यातील मजुरांचा उद्रेक पाहायला मिळाला. ठाण्यातील मुंब्रा आणि मुंबईतील वांद्रा येथील रेल्वे स्थानकावर या मजुरांनी मोठी गर्दी केली होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचं आवाहन करण्यात येत असताना ही गर्दी झाल्याने राज्य सरकारवर भाजपकडून टीका करण्यात येत होती. त्यानंतर आता या वादात बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिची बहिणी रंगोली चंडेल हिनेही उडी घेतली आहे.

'मुंबईची दुसरी इटली होणार...आव्हानात्मक परिस्थिती हाताळण्यासाठी योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वाची गरज आहे,' असं ट्वीट करत रंगोली चंडेल हिने अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान, याआधीही रंगोली चंडेल हिने कोरोना व्हायरसची परिस्थिती हाताळण्यावरून उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.

वांद्र्यातील घटना आणि वाद

वांद्रे स्टेशनबाहेर मोठी गर्दी जमली होती. या पार्श्वभूमीवर भाजपने राज्यातील महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. भाजपकडून विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर नेत्यांनी ठाकरे सरकारवर खरमरीत टीका केली.

संपादन - अक्षय शितोळे

First published: April 15, 2020, 2:02 PM IST

ताज्या बातम्या