वीज बिलाबाबत बॉलिवूड कलाकारांनी केली तक्रार; ऊर्जा मंत्र्यांनी सुचवला हा उपाय

वीज बिलाबाबत बॉलिवूड कलाकारांनी केली तक्रार; ऊर्जा मंत्र्यांनी सुचवला हा उपाय

लॉकडाऊनच्या काळात अनेकांना लाखांपर्यंत बिल आलं आहे. आधीच लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट त्याच विजेच्या बिलाचा झटका

  • Share this:

मुंबई, 29 जून : मुंबईकरांना यंदाची बिलं पाहून जोरदार झटका लागला आहे.  मुंबईतील सर्वसामान्यांपासून बॉलिवूड कलाकारांचेही मोठ्या आकड्यांचे बिल पाहून डोळे मोठे झाले आहे. बर्‍याच कलाकारांना वाढीव वीज बिलाबाबत सोशल मीडियावर तक्रार केली आहे.

अभिनेत्री तापसी पन्नूनंतर अभिनेत्री रेणुका शहाणे यांनीही सोशल मीडियावर वीज बिलाबद्दल तक्रार केली आहे. चित्रपट अभिनेत्री रेणुका शहाणे, तापसी पन्नू यांच्यानंतर तुषार गांधी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा विषय उपस्थित केला आहे. बॉलिवूड कलाकारांच्या तक्रारीवर महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत बिलात कोणतीही फसवणूक झालेली नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बिल हप्त्यात (Installment) भरा, असं नितीन राऊत यावेळी म्हणाले.

हे वाचा-24 तासांतील महाराष्ट्र पोलिसांतील बाधितांचा धक्कादायक आकडा; 2 जणांचा मृत्यू

महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यावर म्हणाले की, विज बिलाबाबत फसवणूक होत नाही. वास्तवात महावितरणाला सुमारे 3500 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. जे लोक त्यांच्या बिलाचे अतिरिक्‍त मूल्य घेतल्याबद्दल तक्रार करतात, ते बिल ऑनलाईन तपासू शकतात आणि हप्ते भरण्याचा पर्याय घेऊ शकतात. त्यांना संपूर्ण रक्कम एकदाच देण्याची गरज नाही. यासंदर्भात विभागाकडून वीजपुरवठा बंद करण्यात येणार नाही.

 

संपादन - मीनल गांगुर्डे

 

 

 

First published: June 29, 2020, 5:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading