Home /News /maharashtra /

सुशांतसिंगच्या आत्महत्येचं भांडवल करुन YouTuberनं कमावले चक्क 15 लाख रुपये

सुशांतसिंगच्या आत्महत्येचं भांडवल करुन YouTuberनं कमावले चक्क 15 लाख रुपये

रशीद सिद्दीकी असं या युट्युबरचं नाव असून तो सिव्हिल इंजीनिअर आहे

मुंबई, 20 नोव्हेंबर: बॉलीवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत (Bollywood Actor Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूबद्दल खोटी माहिती, खोट्या बातम्या आणि खोट्या पोस्ट टाकून बिहारमधील एका 'युट्युबर'नं (YouTuber) सुमारे 15 लाख रुपये कमावल्याची धक्कादायक माहित पोलिस तपासात उघड झाली आहे. रशीद सिद्दीकी असं या युट्युबरचं नाव असून तो सिव्हिल इंजीनिअर आहे. शिवसेना लिगल सेलचे वकील धर्मेंद्र मिश्रा यांनी या युट्युबर विरोधात तक्रार दिली होती. 'FF NEWS'हे युट्युब चॅनल रसीद चालवत होता. हेही वाचा...शाळा सुरू करणं बंधनकारक नाही, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती पोलिसांनी बदनामी, सार्वजनिक गैरवर्तन आणि हेतू पुरस्पर अपमान केल्याच्या आरोपावरून रशिदवर गुन्हा दाखल केला होता. तर रशिद सिद्दीकीन अटकपूर्व जामिनसाठी अर्ज केला होता. त्याला कोर्टाने अटकपूर्व जामीन मंजुरही केला. तसेच पोलिसांनी चौकशीत सहकार्य करण्यास सांगितले आहे. मुंबई पोलिस, महाराष्ट्र सरकार, मंत्री आदित्य ठाकरे आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्याविरूद्ध रशिदची पोस्ट लाखो नेटिझन्सनी पाहिली. यानंतर अक्षय कुमारने मंगळवारी रशिद सिद्दीकीला 500 कोटी रुपये मानहानीची ही नोटीस धाडली होती. रशीद सिद्दिकीनं सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यू संदर्भात सुरुवातीला काही पोस्ट्स सोशल मीडियावर केल्या होत्या. या पोस्ट त्याने सप्टेंबर महिन्यात केल्या होत्या आणि त्यातून त्याने 6.5 लाख रुपये कमावल्याचं तपासात उघड झालं. यापूर्वी मुंबई सायबर पोलिसांनी दिल्ली येथील वकील विभोर आनंद यांना अटक केली होती. या विभोर आनंदने सुशांतसिंग राजपूत मृत्यूशी संबंधित व्हिडिओ पोस्ट केला होता. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांना शिवीगाळ केली होती. या आशयाचे व्हिडिओ पोस्ट करुन वकील विभोर आनंद यांना हजारो युट्युब सबस्क्राइब मिळाले तर रशीद सिद्दीकीचे सुशांतच्या मृत्यू आधी 2 लाख सस्क्राइब होते ते आता 3 लाख 70 हजारांहून जास्त आहेत. अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यूचे लोकांना कुतूहल होते. याचाच फायदा घेवून सुशांतच्या मृत्यूचे भांडवल करुन सिद्दीकीने पैसा कमावण्याची संधी म्हणुन हा विषय युट्युबर मांडली होता. एकदा मीडियाने वेगवेगळ्या सिद्धांतांचा बातम्या देणे सुरू केले, की YouTubers ना देखील संधी मिळाली त्यांनी खोटी माहिती देणे सुरु केले. लॉकडाऊनच्या काळात अनेक युट्युबरने मुंबई पोलिसांच्या प्रतिमेची बदनामी केली आणि पैसे कमावलेत, असे वरिष्ठ आयपीएस अधिकारी म्हणाले. अक्षय कुमारने केलेल्या मानहानीच्या दाव्यानुसार , सिद्दिकी हा म्हटला होता की, अभिनेता सुशांत सिंग राजपूतने मिळालेल्या एमएस धोनी या चित्रपट बाबत अक्षय कुमार खुश नव्हता, तर सुशांतच्या मृत्यूबद्दल आदित्या ठाकरे यांना वाचवण्याकरता अक्षय कुमारने मुंबई पोलिस आणि आदित्य यांच्याशी गुप्तपणे चर्चा केली होती, तर एका व्हिडिओ मध्ये सिद्दीकी म्हणाला होता की, रिया चक्रवर्तीला कॅनडामध्ये पळून जाण्यास अक्षय कुमारने त्याचे प्रायव्हेच जेट देवून मदत केली होती. हेही वाचा..तुम्हीही हा पासवर्ड ठेवलाय?हॅकिंगची शक्यता; या वर्षातील सर्वात कमकुवत 20 पासवर्ड रशीद सिद्दीकीची मासिक YouTube ची कमाई एप्रिल: $ 96 ( 7 हजार 120 रुपये ) मे: $ 04 ( 296 रुपये ) जून: $ 515 ( 38 हजार 200 रुपये ) जुलै: $ 3,667 ( 2 लाख 85 हजार 005 रुपये ) ऑगस्ट: $ 7,518 ( 5 लाख 57 हजार 658 रुपये ) सप्टेंबर: $ 8,775 ( 6 लाख 50 हजार 898 ) ऑक्टोबर: 2 3,211 ( 2 लाख 3 हजार 180 ) नोव्हेंबर: $ 484 ( 35 हजार 901 )
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Maharashtra, Mumbai police, Sushant sing rajput

पुढील बातम्या