मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मुलाला ताप आला म्हणून दवाखान्यात चालले, जीपला झाला अपघात; आईसह एकाचा जागीच मृत्यू

मुलाला ताप आला म्हणून दवाखान्यात चालले, जीपला झाला अपघात; आईसह एकाचा जागीच मृत्यू

या भीषण अपघातात बाळाची आई आणि चुलता जागीच ठार झाले तर बाळासह त्याचे वडील बालंबाल बचावले.

या भीषण अपघातात बाळाची आई आणि चुलता जागीच ठार झाले तर बाळासह त्याचे वडील बालंबाल बचावले.

या भीषण अपघातात बाळाची आई आणि चुलता जागीच ठार झाले तर बाळासह त्याचे वडील बालंबाल बचावले.

बीड, 14 सप्टेंबर : दोन वर्षांच्या चिमुकल्याला रात्री ताप आल्याने आई, वडील, चुलता बोलेरो जीपमधून (mahindra bolero) बीडकडे निघाले. मात्र, वाटेत त्यांच्या जीपला मालवाहू पिकअपने समोरासमोर जोराची धडक दिली. या भीषण अपघातात बाळाची आई आणि चुलता जागीच ठार झाले तर बाळासह त्याचे वडील बालंबाल बचावले. बीड-परळी मार्गावरील (beed parli highway) जरूड फाट्यावर पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार,  रवी नागोराव मिटकर, सोनाली माधव मिटकर अशी मयत दीर-भावजयीची नावे आहेत. चालक विशाल अर्जुन मिटकर (वय २७) हा जखमी असून गौरव माधव मिटकर (वय 2) आणि माधव नागोराव मिटकर (वय 35) हे थोडक्यात वाचले. घाटसावळी तांडा (ता.बीड) येथील रहिवासी असलेल्या मिटकर कुटुंबातील गौरवला रात्री ताप आला.

Wardha : बोट उलटून 11 जण बुडाले, मृतक आणि बेपत्ता नागरिकांची नावे

त्यामुळे पहाटे 3 वाजता त्याला घेऊन कुटुंबीय बीडकडे जीपमधून (एमएच 06 एएस 0467) बीडला निघाले होते तर भूम (जि. उस्मानाबाद) येथून परळीकडे भाजीपाला घेऊन मालवाहू जीप (एमएच 25 एजे- 3403) जात होती. बीड- परळी मार्गावर जरूड फाट्यानजीक मालवाहू पिकअप चालकाचा ताबा सुटला आणि समोरासमोर जोराची धडक झाली.

हा अपघात इतका भीषण होता की, बोलेरो जीप शंभर दीडशे मीटरवर जाऊन उलटली. यात जीपचा चक्काचूर झाला. यात रवी मिटकर व सोनाली मिटकर हे जागीच मृत्युमुखी पडले तर चालक अर्जुन मिटकर हा जखमी झाला. गौरव आणि त्याचे वडील माधव हे अपघातानंतर जीपमधून बाहेर झेपावले. त्यामुळे ते सुरक्षित आहेत.

10 व्या मजल्यावरुन कोसळून जुळ्या बाळांचा मृत्यू; आई FB Live मध्ये होती मग्न

अपघातात जीपचा अक्षरशः चुराडा झाला असून मालवाहू जीपचे देखील नुकसान झाले. पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या भीषण अपघातात आई आणि चुलत्याचा मृत्यू झाल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

First published: