हा अपघात इतका भीषण होता की, यात बोलेरो गाडी अक्षरश: कंटेनरमध्ये घुसली आणि समोरचा भाग हा हवेतच लटकला होता. बोलेरोचा या अपघातात चुराडा झाला आहे. या अपघात २ जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. बळवंत कुमार तसंच संजय मीर असं अपघातातील दोन्ही जखमींची नावे आहेत. उपचारा करता दोघांनाही ओझर्डे येथील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. महामार्ग पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या साह्याने काही वेळातच महामार्गावरून हटवली. पिंपरी चिंचवड : किरकोळ कारणावरून बाऊन्सरने तरुणाला केली मारहाण दरम्यान, पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडीत वाढदिवस साजरा करत असताना बिअरच्या बॉटल्सचे फवारे उडवत असताना काही थेंब हॉटेल्स मॅनेजमेंटच्या बाऊन्सरच्या अंगावर पडल्याने मारहाण झाल्याची घटना घडली आहे. यात एक जण किरकोळ जखमी झाला असून अंगरक्षाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शुभम बा कचरे असं मारहाण झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तर पांडुरंग खोते असं मारहाण करणाऱ्या बाऊन्सरचं नाव आहे.मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोलेरो आणि कंटेनरचा भीषण अपघात pic.twitter.com/Uh2rVVtCMt
— News18Lokmat (@News18lokmat) March 6, 2020
हिंजवडीतील एफएमएल या हॉटेलमध्ये फिर्यादी हे मित्रांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले होते. तेव्हा त्यांच्यामध्ये मौज मजा सुरू होती. त्याच वेळी वाढदिवस साजरा करत असताना (शाम्पेन) बिअरची बॉटल्सचे फवारे हवेत उडवण्यात आले, काही थेंब हॉटेलमधील बाऊन्सरच्या अंगावर पडले. यावरून फिर्यादी शुभम कचरे आणि अंगरक्षक पांडुरंग खोते यांच्यात वाद झाला. पांडुरंग खोते याने शुभम यांना शिवीगाळ करत प्लास्टिकच्या पाईप ने मारहाण केली आहे. दरम्यान, या प्रकरणी शुभम यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. असून आरोपी बाऊन्सरला अटक करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. घटनेचा अधिक तपास गुन्हे पोलीस निरीक्षक अजय जोगदंड हे करत आहेत.पिंपरी चिंचवड : किरकोळ कारणावरून बाऊन्सरने तरुणाला केली मारहाण pic.twitter.com/H5OEoP86W2
— News18Lokmat (@News18lokmat) March 6, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.