मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /साताऱ्यात साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट, कामगाराचा होरपळून मृत्यू

साताऱ्यात साखर कारखान्यात बॉयलरचा स्फोट, कामगाराचा होरपळून मृत्यू

या स्फोटामुळे कारखान्याच्या परिसरातील चार किमीचा परिसर हादरुन गेला होता.

या स्फोटामुळे कारखान्याच्या परिसरातील चार किमीचा परिसर हादरुन गेला होता.

या स्फोटामुळे कारखान्याच्या परिसरातील चार किमीचा परिसर हादरुन गेला होता.

सातारा, 5 डिसेंबर: साताऱ्यातील कोरेगाव (Satara koregaon) तालुक्यातील चिमणगाव येथील जंरडेश्वर साखर कारखान्यात (Jarandeshwar Sugar Factory ) बॉयलरचा भीषण स्फोट झाला. स्फोट इतका भयंकर होता की, यात एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला तर सहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

संभाजी घोरपडे असं मृत कामगाराचं नाव आहे. जखमी कामगारांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा...रक्ताचा मोठा काळाबाजार! 500 रुपयांना मिळणाऱ्या बॅगसाठी मोजावे लागतात 2000

मिळालेली माहिती अशी की, जरंडेश्वर साखर कारखान्यात रात्री 10 वाजेच्या सुमारात बॉयलर फुटून भीषण स्फोट झाला. स्फोटात एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

जखमी झालेल्या सहा कामगारांवर कोरेगाव येथील खासगी रुग्णायालय उपचार सुरु आहेत. या स्फोटामुळे कारखान्याच्या परिसरातील चार किमीचा परिसर हादरुन गेला होता. बॉयलिंग हाऊसचे स्टीम उघडल्याने हा स्फोट झाल्याची माहिती जखमी कामगारांनी पोलिसांना दिली. या घटनेचा कोरेगाव पोलीस पंचनामा करत आहेत. या घटनेची नोंद कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये अद्याप करण्यात आली नसून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, जरंडेश्‍वर शुगर मिल्सच्या केनयार्डमध्ये अपघाताची कमी नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी ऊस खाली उतरवत असताना ट्रॉलीवरून पडल्यानं एका ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला होता. दशरथ त्र्यंबक जाधव (वय-36, रा. तळिये) असं मृत चालकाचं नाव होतं.

दशरथ त्र्यंबक जाधव हे तळिये येथील श्रीकांत शिवाजीराव चव्हाण यांच्या ट्रॅक्टरवर (एमएच-11-जी-4396) चालक म्हणून काम करत होते. चव्हाण यांचा ट्रॅक्टर व ट्रॉली जरंडेश्‍वर शुगर मिल्ससाठी ऊस वाहतूक करत आहे.

हेही वाचा...लग्नसराईच्या काळात सोन्याचे दर वाढले, चांगल्या कमाईसाठी अशाप्रकारे करा गुंतवणूक

कारखान्याच्या केनयार्डमध्ये हा ट्रॅक्टर ऊस उतरवण्यासाठी गेला होता. त्यावेळी जाधव हे ट्रॉलीवर चढले. तेथून खाली पडल्याने ते जखमी झाले. त्यांनी कारखान्याच्या वाहनातून जाधव यांना कोरेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, तेथे डॉक्टरांनी जाधव यांना मृत घोषित केलं.

First published:
top videos

    Tags: Maharashtra, Satara