शिरपूरमध्ये भीषण स्फोट.. केमिकल फॅक्टरीत बॉयलर फुटला; 12 ठार 22 जण जखमी

शिरपूरमध्ये भीषण स्फोट.. केमिकल फॅक्टरीत बॉयलर फुटला; 12 ठार 22 जण जखमी

केमिकल फॅक्टरीत बॉयलर फुटून मोठा स्फोट झाला. यात 12 जणांचा मृत्यू झाला असून 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन चिमुरड्यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

  • Share this:

दीपक बोरसे, (प्रतिनिधी)

धुळे, 31 ऑगस्ट- शिरपूरमधील वाहाडी येथील केमिकल फॅक्टरीत आज (शनिवार) सकाळी भीषण स्फोट झाला. केमिकल फॅक्टरीत बॉयलर फुटून मोठा स्फोट झाला असून संपूर्ण परिसरात आग पसरली आहे. यात 12 जणांचा मृत्यू झाला असून 22 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन चिमुरड्यांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. स्फोट एवढा भीषण होता की, स्फोटात संपूर्ण फॅक्टरी जळून खाक झाली आहे. स्फोटामुळे दोन किलोमीटरपर्यंत जमीन हादरली. स्फोटाच्या तीव्रतेमुळे शिरपुरसह आजूबाजूची गावांनाही मोठा हादरा बसला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले आहे.

मिळालेली माहिती अशी की, शिरपूर-शहादा महामार्गावर असलेल्या वाहाडी येथील केमिकल फॅक्टरीत स्फोट झाला. फॅक्टरीत 100 कामगार काम करत होते. फॅक्टरीत कामगार अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे.

पीनाबाई जितेंद्र पावरा (वय-35, रा.चांदसूर्या), रोशनी पावरा (वय-14, रा.चांदसूर्या), पंजाबाई विशाल पावर (वय-25 रा. वकवाड), सुबीबाई रमेख पावरा (वय-25, रा.चांदसूर्या), रमेश सजन कोळी (वय-35, रा. वाघडी) अशी मृतांची नावे समोर आली आहेत. काहींची अद्याप ओळख पटलेली नाही.

दरम्यान ही फॅक्टरी मुंबईच्या उमीत गृपने चालवण्यासाठी घेतली होता. ती आता गुजरातमधील व्यक्ती चालवत होता. या फॅक्टरीत औषधीसाठी लागणारे केमिकल तयार केले जात होते. तीन शिफ्टमध्ये या फॅक्टरीचे काम चालत होते. शिफ्ट बदलण्याच्या वेळी ही घटना घडली आहे. स्फोटाचा सर्वाधिक फटका वाघाडी गावाला बसला आहे. फॅक्टरी परीसरातील घरांची मोठी पडझड झाली आहे. अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. परिसरातील अनेक वाहने जळून खाक झाली आहेत.

मृत कामगारांना मदत जाहीर..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घनटेचे दु:ख व्यक्त केले आहे. मृत कामगारांच्या कुटुंबाला प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

VIDEO:चिमुरडीचं करणार होता अपहरण, नवी मुंबईकरांनी धु-धु धुतला

Published by: Sandip Parolekar
First published: August 31, 2019, 10:44 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading