मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

जालन्यात रोलिंग मिलमध्ये बॉयलरचा स्फोट, 3 कामगार ठार

जालन्यात रोलिंग मिलमध्ये बॉयलरचा स्फोट, 3 कामगार ठार

ओम साई राम रोलिंग मिलमध्ये सळई बनविताना बॉयलरमध्ये स्फोट होऊन हा अपघात झाला.

ओम साई राम रोलिंग मिलमध्ये सळई बनविताना बॉयलरमध्ये स्फोट होऊन हा अपघात झाला.

ओम साई राम रोलिंग मिलमध्ये सळई बनविताना बॉयलरमध्ये स्फोट होऊन हा अपघात झाला.

  • Published by:  sachin Salve

विजय कमळे पाटील, प्रतिनिधी

जालना, 05 मार्च : जालना जिल्ह्यातील एका रोलिंग मिलमध्ये झालेल्या अपघातात 3 कामगारांचा भाजून मृत्यू झालाय तर काही कामगार गंभीररीत्या जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नवीन औद्योगिक वसाहतीतील ओम साई राम रोलिंग मिलमध्ये सळई बनविताना बॉयलरमध्ये स्फोट होऊन हा अपघात झाला. या अपघातात होरपळून मृत्यू झालेले तिन्ही कामगार परप्रांतीय असल्याची प्राथमिक माहिती असून त्यांची ओळख मात्र अद्यापही पटू शकलेली नाही.

या अपघात अनेक कामगार जखमी झाले असून काही जणांवर जालना येथील तर काहींवर औरंगाबादच्या सरकारी आणि खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच चांदनजीरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. याप्रकरणी अद्यापपर्यंत पोलिसांनी कुठलाच गुन्हा गुन्हा नोंदवला नाही.

माध्यमांच्या प्रतिनिधी आणि सर्वसामन्यांना घटनास्थळी जाण्यास मज्जाव करण्यात आलंय. घटनेचं गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी ही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि याप्रकरणी योग्य ती कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगितलं.

डोंबिवलीत बॉयलर स्फोटामुळे आगडोंब

दरम्यान, मागील महिन्यात 18 फेब्रुवारी रोजी डोंबिवली MIDC मधील मेट्रोपॉलिटन कंपनीला  भीषण आग लागली होती. बॉयलरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागली होती.

या आगीमुळे परिसरात केमिकलमुळे दुर्गंधीही पसरली होती. आग लागल्यानंतर केमिकल ड्रमसचे स्फोट झाले. या स्फोटाच्या आवाजाने परिसर हादरला. या रासायनिक पदार्थांमुळेच  आग आणखी पसरली होती. अखेर 6 ते 7 तासानंतर आग आटोक्यात आली होती.

First published:

Tags: Jalana