सावधान... शेतकऱ्यांना विकलं जातंय बनावट सेंद्रीय खत

सावधान... शेतकऱ्यांना विकलं जातंय बनावट सेंद्रीय खत

खतं घेताना शेतकऱ्यांनी सावध राहिलं पाहिजे असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम, औरंगाबाद 7 जून : पावसाळा सुरू होत असताना शेतकऱ्यांची पेरणी साठीची लगभग पाहायला मिळत आहे. या लगबगीत शेतकऱ्यांना बोगस सेंद्रीय खत विकून फसवणुकीची अनेक प्रकरण समोर आली आहेत. रासायनिक खतांचे दुष्परिणाम समोर आल्याने गेली काही वर्ष शेतकऱ्यांचा सेंद्रीय खतांकडे कल आहे. हे लक्षात घेऊन बनावट कंपन्यांच्या नावावर शेतकऱ्यांच्या माथी बोगस खत मारण्यात येत आहे. औरंगाबादच्या कृषी विभागाने अशा प्रकारचं लाखो रुपयांचं बोगस खत जप्त केलंय.

औरंगाबाद जिल्हा परिषदच्या कृषी विभागाने चार ठिकाणी छापा घालून लाखोंचं खत जप्त केलय. कृषी विभागाने औरंगाबाद शेंद्रा औद्योगिक वसाहतीत ठेवलेला लाखोंचा बनावट सेंद्रिय खताचा मुद्देमाल जप्त केला असून एकाच आठवड्यात फुलंब्री, गंगापूर आणि कन्नड तालुक्यात अशाच प्रकारची कारवाई जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केलीय. सेंद्रीय किंवा अन्य खत खरेदी करताना बळीराजाला सावध राहण्याचं आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केलंय.

कृषी विभागाची कारवाई

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात बनावट खताचा शेतकऱ्यांना पुरवठा केला जात असल्याच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर कृषी अधिकारी आनंद गंजेवार यांनी भरारी पथक निर्माण करून शोध मोहीम सुरु केली.

या कारवाईत कन्नड, गंगापूर आणि खुलताबाद येथे काही बनावट सेंद्रिय खताचा साठा आढळून आला.

त्यानंतर औरंगाबादच्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीत असलेल्या गोदामावर घालून मोठा साठाही जप्त करण्यात आला. कृषी विभागाने हा सर्व साठा जप्त करून हे खत कोणत्या कंपन्यांनी दिलं याबाबत शोध सुरू केलाय. स्वस्त खत मिळेल या अमिषाला बळी पाडून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे.

 शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना खालील पद्धतीची काळजी घेणे आवश्यक असल्याचं आवाहन मत कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय.

1) शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक विक्रेत्याकडूनच खतांची खरेदी करावी

2) शेतकऱ्यांनी खते खरेदी करत असताना त्या खतांमध्ये दावा केलेल्या अन्नद्रव्यांची त्याप्रमाणात उपलब्धता आहे किंवा नाही हे बॅग वरील मजकुरावरून वाचून प्रथमतः समजून घ्यावे.

3) बऱ्याच वेळा संयुक्त खते जसे 10:26:26 किंवा 15 :15 :15  किंवा डीएपी या खतांना पर्यायी स्वस्त खत असा खोटा दावा करून शेतकऱ्यांना खत विक्री होत असल्यास त्यास बळी न पडता त्याबाबत कृषी विभाग पंचायत समिती जिल्हा परिषद येथे तक्रार केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

4) काहीवेळा काही खतांवर त्या खतात असलेल्या अन्नद्रव्यांच्या प्रमाणाचा उल्लेख न करता विक्री होत असल्यास त्याबाबत संशय घेऊन ती खते घेणे टाळावे व तक्रार करावी.

5) पिकास अन्नद्रव्य म्हणून नायट्रोजन फॉस्फरस व पोटॅश हे तीन मुख्य अन्नद्रव्य लागत असून याची किती मात्रा संबंधित बॅगमध्ये आहे हे बॅग वर लिहिलेले असते. त्याची पडताळणी करून तुलनेने जास्त अन्नद्रव्य मात्रा असलेले खत कमीत कमी किमतीत जे असेल असे शक्य तो दर्जेदार उत्पादक कंपनीचे खत घ्यावे.

First published: June 7, 2019, 3:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading