जालना, 4 मे- कृषी विभाग आणि पोलिसांच्या पथकाने गुंडेवाडी गावाजवळील बनावट सेंद्रिय खताच्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. राजलक्ष्मी फर्टिलायझर नामक कारखान्याच्या गोदामातून तब्बल 63 लाखांचा बोगस खताचा साठाही जप्त करण्यात आला आहे.
'नीमपॉवर' नावाने बनावट खत सेंद्रीय खत असल्याचे भासवून पिकांच्या वाढीसाठी हे उपयुक्त आहे, असे सांगून या खताची विक्री केल्या जाणार होती. कृषी विभागाने या खतांची तपासणी केली असता त्यात असे कुठलेही गुणधर्म आढळले नाही. त्यामुळे हे खत बनावट असल्याचा कृषी विभागाच्या निदर्शनास आले. दरम्यान, कृषी विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने या गोदामावर छापा टाकला. बनावट खतांच्या गोण्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी गोदाम मालक आणि मॅनेजरविरोधात चंदजीरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपाय उपविभागीय पोलिस अधीक्षक सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
टोल नाक्यावर माकडाचा डल्ला, VIDEO व्हायरल