Home /News /maharashtra /

एकनाथ खडसेंना धक्का, बोदवड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही शिवसेनेची बाजी

एकनाथ खडसेंना धक्का, बोदवड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीतही शिवसेनेची बाजी

बोदवड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची आज निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेनेचे आनंदा पाटील तर उप नगराध्यक्षपदी रेखा गायकवाड यांची एकतर्फी निवड झाली.

जळगाव, 18 फेब्रुवारी : बोदवड नगरपंचायतीच्या (Bodwad Nagar Panchayat) नगराध्यक्षपदाची आज निवडणूक झाली. या निवडणुकीत शिवसेनेचे आनंदा पाटील (Aanda Patil) तर उप नगराध्यक्षपदी रेखा गायकवाड (Rekha Gaikwad) यांची एकतर्फी निवड झाली. त्यामुळे शिवसेनेने जोरदार जल्लोष करुन हा विजय साजरा केला. बोदवड नगरपंचायतीचा विचार केला तर या निवडनुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. त्याला कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या मतदारसंघात ही निवडणूक पार पडली होती. त्यांनी या निवडणुकीसाठी आपली संपूर्ण ताकद लावली असल्याचं दिसून आले होते. दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत बोदवड नगरपंचायतीमध्ये खडसे यांच्या राष्ट्रवादीला यश मिळणार नाही यासाठी मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील आणि भाजप नेते गिरीश महाजन यांनी रणनीती अखली असल्याचं पाहायला मिळालं होतं. अखेर एकनाथ खडसे यांच्या हातून ही नगरपंचायत निसटली. बोदवड नगरपंचयात निवडणुकीत 17 जागांपैकी शिवसेनेला 9 जागी, राष्ट्रवादीला 7 जागी आणि भाजपला एका जागेवर विजय मिळला होता. त्यात भाजपने शिवसेनेला पाठिंबा दिल्याने शिवसेनेचं संख्याबळ दहा झाल्याने स्पष्ट बहुमत शिवसेनेला मिळालं. त्यामुळे शिवसेनेचा एकतर्फी नगराध्यक्ष म्हणून आनंदा पाटील तर उप नगराध्यक्ष पदासाठी रेखा गायकवाड यांची निवड झाली असल्याचं पाहायला मिळालं आहे. (महिलांप्रमाणे पुरुषांनीही चाळीशीत राहायला हवं अलर्ट; नाहीतर बळावतील 'हे' आजार) आमदारकीनंतर बोदवड नगरपंचायतीमध्ये देखील जनता शिवसेनेच्या पाठीशी उभी राहिली असल्याने आमदार चंद्रकांत पाटील यांनी ही परिवर्तनाची नांदी असल्याचं म्हटलं आहे. गेली चाळीस वर्ष एकहाती या मतदारसंघात आपले वर्चस्व गाजविणाऱ्या एकनाथ खडसे यांच्यासाठी मात्र हा मोठा धक्का मानला जात आहे. जनतेने विकासासाठी आम्हाला साथ दिली असल्याने आम्ही जनतेला विकास काम करुन देत त्यांचा विश्वास सार्थ करणार असल्याचंही आमदार चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान, बोदवड नगर पंचायतीमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष आणि उप नगराध्यक्ष झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात आतिशबाजी आणि शक्ती प्रदर्शन करून जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं.
Published by:Chetan Patil
First published:

पुढील बातम्या