नाल्यात उलटली नाव, तरुणांनी उड्या टाकून वाचवले महिलांना, LIVE VIDEO

नाल्यात उलटली नाव, तरुणांनी उड्या टाकून वाचवले महिलांना, LIVE VIDEO

शेतातून परतणार्‍या 8 ते 10 मजूर महिला लाकडापासून बनवलेल्या नावेमध्ये बसून (रूख ) नाला ओलांडण्याचा प्रयत्न करत होत्या.

  • Share this:

भास्कर मेहरे, प्रतिनिधी

यवतमाळ, 05 जुलै : जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात नदी पार करत असताना अचानक नाव उलटल्यामुळे 8 ते 10 महिला पुरात अडकल्या होत्या. सुदैवाने वेळीच गावातील तरुणांनी धाव घेऊन या महिलांचे प्राण वाचवले.

उमरखेड तालुक्यातील मौजे कुरळी येथे संध्याकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे गावालगत असलेल्या नाल्याला पूर आला होता. संध्याकाळच्या वेळेस शेतातून परतणार्‍या 8 ते 10 मजूर महिला लाकडापासून बनवलेल्या नावेमध्ये बसून (रूख )  नाला ओलांडण्याचा प्रयत्न करत होत्या. मात्र, संतुलन बिघडल्यामुळे रुख उलटली. त्यात या महिला पुराच्या पाण्यामध्ये  पडल्या.

त्याच दरम्यान पलीकडच्या बाजूने संबंधित गावच्या कोतवालाचा मुलगा आणि त्याचे मित्र पूर पाहण्यासाठी गेले होते. ही घटना त्यांच्या लक्षात येताच त्यांनी स्वतः  नाल्याच्या प्रवाहामध्ये उड्या मारल्या व त्या वाहून जाणार्‍या महिलांना त्यांनी सुरक्षितपणे काठावर आणले.

धक्कादायक, पुण्यातील भाजपच्या माजी आमदाराला आणि मुलालाही कोरोनाची लागण

या नाल्यावरील भोदूनगर ते कुरळी या दोन गावांना जोडणार नाल्यावर पूल करण्यात यावा अशी मागणी गेल्या 10 वर्षांपासून प्रलंबित आहे. शेतकरी, शेतमजूर शेतात जाण्यासाठी दोर किंवा रुखचा वापर करतात.

त्यामुळे कधीही मोठी दुर्घटना होऊ शकते. एखादी मोठी दुर्घटना झाल्यानंतरच शासनाचे डोळे उघडतील का? असा प्रश्न गावकरी करीत आहेत.

संपादन - सचिन साळवे

First published: July 5, 2020, 2:50 PM IST
Tags: Boat

ताज्या बातम्या