• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • 'मुख्यमंत्र्यांना आंघोळीला उशीर होता कामा नये, त्यांचं पाणी बिल मी चेकनं भरणार', आव्हाडांचा टोला

'मुख्यमंत्र्यांना आंघोळीला उशीर होता कामा नये, त्यांचं पाणी बिल मी चेकनं भरणार', आव्हाडांचा टोला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्याचा मुंबई महापालिकेनं डिफॉल्टर यादीत समावेश केला आहे.

 • Share this:
  मुंबई, 24 जून : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्याचा मुंबई महापालिकेनं डिफॉल्टर यादीत समावेश केला आहे. साडेसात लाख रुपये पाणी बिल थकल्यानं महापालिकेकडून ही कारवाई करण्यात आली आहे. यावरून विरोधी पक्षनेत्यांना सत्ताधारी भाजप आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यासाठी आयती संधी मिळाली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तर मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. (पाहा : VIDEO : मंत्रिमंडळात खडसेंना संधी का नाही? अजित पवारांची तुफान फटकेबाजी) नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड ? 'मुख्यमंत्र्यांचं पाण्याचं बिल मी भरणार आहे. मुख्यमंत्र्यांना आंघोळीला, तोंड धुवायला पाणी पाहिजे. त्यांना कुठल्याही पद्धतीचा उशीर होता कामा नये, अन्यथा निर्णय प्रक्रियेत उशीर होईल. त्यामुळे त्यांचं पाण्याचं बिल मी चेकनं भरणार आहे', असं म्हणत आव्हाड यांनी टोला हाणला आहे. विधानभवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे. (पाहा : VIDEO : 'आता माझी सटकली', बैलाने व्यापाऱ्याला लाथ मारून 8 फूट लांब फेकलं) दरम्यान, मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानांची 8 कोटी रूपयांची पाणी बिलं थकली आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महापालिकेकडून पाणी बिल थकबाकीदारांची माहिती मिळवली होती. याद्वारे थकीत पाणी बिलाची माहिती समोर आली आहे. (पाहा  :विधानसभेत मुख्यमंत्र्यांची तुफान फटकेबाजी, पाहा VIDEO) ...आणि संभाजीराजेंना अश्रू अनावर झाले, पाहा VIDEO
  Published by:Akshay Shitole
  First published: