मुंबईच्या महापौरांनी जेव्हा आयुक्तांच्या माध्यम सल्लागाराला दिला परिचय, नमस्कार मी...

मुंबईच्या महापौरांनी जेव्हा आयुक्तांच्या माध्यम सल्लागाराला दिला परिचय, नमस्कार मी...

महापालिकेचे आयुक्त अजोय मेहेता यांचे माध्यम सल्लागार राम दुतोंडे यांच्याबद्दल महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना काहीच माहिती नव्हतं. अशी काही नियुक्ती झाली आणि तिथे कुठला अधिकारी काम करतो याबाबत महापौर गेली दोन वर्ष अंधारात होते.

  • Share this:

ज्योत्स्ना गंगने, मुंबई, ता. 30 ऑगस्ट : देशातली सगळ्यात मोठी आणि श्रीमंत महापालिका म्हणजे मुंबई. मुंबई महापालिकेचं बेजेट हे अनेक छोट्या राज्यांच्या बेजेट पेक्षा मोठं असंत. एक कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मुंबई महापालिकेचा कारभारही तेवढाच अवाढव्य. एवढा प्रचंड मोठा विस्तार आणि शक्तिशाली असलेल्या महापालिकेचा कारभार तेवढ्याच सक्षमपणे सांभळणं आवश्यक असतं. मात्र मुंबई महापालिकेत किती सावळा गोंधळ आहे याचं उदाहरण आज समोर आहे. महापालिकेचे आयुक्त अजोय मेहेता यांचे माध्यम सल्लागार राम दुतोंडे यांच्याबद्दल महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना काहीच माहिती नव्हतं. अशी काही नियुक्ती झाली आणि तिथे कुठला अधिकारी काम करतो याबाबत महापौर गेली दोन वर्ष अंधारात होते हे आज एका बैठकीत स्पष्ट झाल्यानं पालिकेतल्या सावळ्या गोंधळाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली.

लोकसभेसोबत 13 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका घ्या, विधी आयोगाची शिफारस

त्याचं असं झाली की, महापौरांनी आज बीएमसीत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत गणेश मंडळांना घ्याव्या लागत असलेल्या ऑनलाईन परवानगीचा विषय निघाला. ही तारिख वाढवण्यात आल्याची माहिती राम दुतोंडे यांनी वाट्सअप आणि ई-मेल वर पाठवल्याचं जेव्हा महापौरांना समजलं तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. हे राम दुतोंडे कोण आहेत? असा प्रश्न त्यांनी बैठकीत विचारला. तेव्हा त्यांना त्यांच्या पीए ने सांगितलं की राम दुतोंडे हे आयुक्तांचे माध्यम सल्लागार आहेत. तेव्हा तर महापौर आणखीच आश्चर्यचकीत झाले.

उदयनराजेंना बिनविरोध निवडून द्या, दिवाकर रावतेंचं आवाहन

त्यांनी दुतोंडेंना बैठकीनंतर आपल्या चेंबरमध्ये बोलावण्याचं फर्मान सोडलं. महापौर कार्यालयाला न विचारता हे अधिकारी परस्पर माहिती माध्यमांना देतातच कशी असा आक्षेप महापौरांनी घेतला. आणि तातडीनं दुतोंडेना बोलावा असा आदेश एकदा नाही तर तीन वेळा दिला. महापौरांची घाई बघून अधिकाऱ्यांनीही तातडीनं दुतोंडेंना शोधून महापौरांच्या चेंबरमध्ये हजर केलं. ते आल्यानंतर महापौरांच्या पीएंनी त्यांची ओळख करून दिली. हे राम दुतोंडे, आयुक्तांचे माध्यम सल्लागार आहेत. ते ऐकताच महापौरांचा पारा चढला. ते दुतोंडेंना म्हणाले, मी तुम्हाला या आधी कधीच पाहिलं नाही? तुम्ही कुठल्या पदावर काम करता?

नोटबंदी चूक नाही हा मोठा घोटाळा,राहुल गांधींचा घणाघात

त्यावर आयुक्तांचा माध्यम सल्लागार म्हणून काम करत असल्याचं दुतोंडेंनी सांगितलं. त्यावर महापौरांनी पुन्हा प्रश्न विचारला किती वर्षांपासून काम करता? महापौरांचा राग बघून, दुतोंडे शांतच राहिले. गेली दोन वर्ष ते आयुक्तांचे माध्यम सल्लागार म्हणून काम करताहेत हे महापौरांना माहितच नाही ते त्यांच्या लक्षात आलं होतं.तुम्हाला पगार कोण देतं? महापौरांचा आणखी एक प्रश्न, त्यावर दुतोंडेंनी उत्तर दिलं बीएमसी. त्यावर महापौरांचा पारा आणखीच चढला. तुम्ही बीएमसीत काम करता आणि तुमचं नाव आणि चेहेराही कधी महापौरांनी पाहिलेला नाही.

माध्यम सल्लागाराचं काम काय असतं याची शिकवणीही महापौरांनी घेतली. बीएमसीचे निर्णय तुम्ही महापौर कार्यालयाला न कळवता परस्पर घेताच कसे असं महाडेश्वरांनी सुनावताच, आयुक्तांनीच तसं सांगितलं होतं असं दुतोंडेंनी सांगितलं. त्यावर स्वत:ला सावरत महापौरांनी त्यांना पुन्हा फटकारलं.

पदाची प्रतिष्ठा काय असतं हे प्रशासनाला पुन्हा सांगावं लागणार का? तुम्हाला माहित आहे का मी कोण आहे ते? असं विचारत त्यांनी मोठ्या त्रासिक मुद्रेनं त्यांना आपला परिचय करून दिला, नमस्कार! मी मुंबईचा महापौर विश्वनाथ महाडेश्वर.

VIDEO : लोकल स्टेशनवर चोराची चोरी तरुणाच्या जीवावर बेतली

 

First published: August 30, 2018, 9:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading