Home /News /maharashtra /

मुंबईसाठी पुढील 3 आठवडे महत्त्वाचे, लोकल सुरू करण्याच्या निर्णयावर BMC आयुक्त म्हणाले...

मुंबईसाठी पुढील 3 आठवडे महत्त्वाचे, लोकल सुरू करण्याच्या निर्णयावर BMC आयुक्त म्हणाले...

मुंबई शहरात गेल्या तीन दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दुप्पट वृद्धी

    मुंबई, 24 नोव्हेंबर: दिवाळीनंतर (Diwali)देशाची राजधानी दिल्लीमध्ये कोरोनाचा (Coronavirus) पुन्हा एकदा उद्रेक झाला. दिल्लीपाठोपाठ देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही (Mumbai) परिस्थिती चिंताजनक होताना दिसत आहे. मुंबई शहरात गेल्या तीन दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दुप्पट वृद्धी झाली आहे. त्यामुळे मुंबईसाठी पुढील तीन आठवडे महत्त्वाचे असल्याचं बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल (Mumbai municipal Corporation, Commissioner Iqbalsing chahal) यांनी सांगितलं. हेही वाचा...मनसेच्या पदाधिकाऱ्यांनं फोडलं प्रांताधिकाऱ्यांच शासकीय वाहन, पाहा LIVE VIDEO CNBC-TV18 सोबत संवाद साधताना आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितलं की, मुंबईची लाईफलाईन अर्थात मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरु करणार, असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केला जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लोकल सुरु करण्याबाबतचा निर्णय हा 15 डिसेंबरनंतर घेऊ, अशी महत्त्वपूर्ण माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्यानं राज्य सरकार सतर्क झालं आहे. त्यामुळेच आता पुन्हा एकदा प्रवासाबाबतचे नियम कठोर करण्यात येत आहेत. दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा राज्यातून महाराष्ट्रात हवाई, रेल्वे व रस्ते मार्गाने येणाऱ्या प्रवाशांना कोविड आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आपल्यासोबत बाळगण्याच्या सूचना सरकारकडून करण्यात आल्या आहेत, असे मुंबई महापालिका आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केलं. मुंबईतील सर्व रेल्वेच्या स्टेशनवरही तपासणी सुरू केली आहे. मुंबईत सध्या कोरोनाची स्थिती ही नियंत्रणात आहे. बेड योग्य प्रकारे उपलब्ध आहेत. त्यामुळे कोरोनाची लाट येईल की नाही हे माहीत नाही. पण पालिकेने याचे नियोजन सुरू केले आहे. त्यामुळे आता लोकांनी जे नियम दिले ते पाळणं गरजेचे असणार आहे, असे इक्बालसिंग चहल यांनी सांगितलं आहे. इक्बालसिंग चहल म्हणाले, मुंबई मास्क न वापरणाऱ्यांविरोधात योग्य प्रकारे कारवाई होत आहे. पण तरीही काही लोक ऐकत नाही. त्यामुळे लोकांनी आता सुधारलं पाहिजे. याच पार्श्वभूमीवर आता मास्क कारवाईत जमलेल्या रकमेतून नागरिकांना पालिका मास्क विकत घेऊन वाटप करणार आहे. हेही वाचा...CORONA महासाथीचा अंत जवळ, WHO देणार गूड न्यूज; भारतीय तज्ज्ञांचा दावा सरकारची नवी नियमावली : 1. दिल्ली, गुजरात, राजस्थान आणि गोवा राज्यातून येणाऱ्या प्रवाश्यांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक 2. महाराष्ट्रात येण्याच्या 72 तास आधी ही करोना चाचणी करावी लागेल. 3. राज्यात येणाऱ्या प्रवाश्यांकडे आरटी-पीसीआर रिपोर्ट नसेल, त्यांना विमानतळावर स्वखर्चाने करोना चाचणी करावी लागेल. 4. महाराष्ट्रात दाखल झालेल्या ज्या प्रवाशांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल, त्यांच्याशी संपर्क साधून आधीपासून अस्तित्वात असलेल्या प्रोटोकॉलनुसार उपचार केले जातील. 5. चाचणी निगेटीव्ह असेल तर प्रवाशाला घरी जाण्याची परवानगी देण्यात येईल. फोन नंबर, पत्त्यासह सर्व माहिती त्या प्रवाशाकडून घेतली जाईल.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: BMC, Corona, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus, Coronavirus symptoms, Maharashtra, Mumbai, Mumbai local, World After Corona

    पुढील बातम्या