Home /News /maharashtra /

बीएमसीची मोठी चूक, न्यायालयाच्या गेटवरच लावलं 'कंटेन्मेंट झोन' लिहिलेलं बॅनर

बीएमसीची मोठी चूक, न्यायालयाच्या गेटवरच लावलं 'कंटेन्मेंट झोन' लिहिलेलं बॅनर

मुंबईसह परिसरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे.

    मुंबई, 24 जून: मुंबईसह परिसरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. त्यात मुंबई महापालिकाकडून (बीएमसी) मोठी चूक झाली आहे. बीएमसीने चक्क एका कोर्टाच्या गेटवर कोरोना संक्रमीत परिसर अर्थात कंटेन्मेट झोन असं लिहिलेलं बॅनर लावलं. मात्र, ही चूक लक्षात येताच नंतर संबंधित बॅनर काढण्यात आलं आहे. मुंबईतील एका कनिष्ठ न्यालयातील वकील आणि कस्टेडियनला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर बीएमसीनं थेट कोर्ट परिसरच कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केला होता. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. मात्र, ही चूक अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर कंटेन्मेंट झोनचं बॅनर तातडीनं काढून टाकण्यात आलं आहे. हेही वाचा..मुंबईच्या रस्त्यावरचा बिस्लेरी पाणीपुरीवाला Corona मुळे गेला; नागरिकांनी 24 तासांत उभा केला निधी मुंबईमधून 70 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटव्ह रुग्ण बेपत्ता दुसरीकडे, मुंबईसह उपनगरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्यानं वाढत आहे. कोरोना नियंत्रणात आणताना प्रशासनाच्या नाकी नऊ आले असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, मालाडमधील तब्बल 70 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बेपत्ता आहेत. त्यामुळे या रुग्णांना शोधण्याचं एक मोठं आव्हान मुंबई महापालिकेसमोर उभं ठाकलं आहे. याबाबत महापालिकेने पोलिसांना एक पत्र पाठवून मदत मागितली आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या पी वार्डमधील हे सगळे रुग्ण आहेत. या रुग्णांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन राबविण्यात येत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त प्रणय अशोक यांनी दिली आहे. सध्या मालाडमधील पी वार्डात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होते आहे. अशातच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बेपत्ता होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. कोरोनाची चाचणी घेताना संबंधित व्यक्तीचा फोन नंबर, पत्ता आदी माहिती वैद्यकीय विभागाकडून घेतली जात आहे. मात्र, नागरिक खरी माहिती लपवत असल्याची धक्कादायक प्रकारही समोर आली आहे. त्यात प्रयोगशाळांमध्ये कार्यरत कर्मचारी चाचणी घेण्यास आलेल्या नागरिकांची माहिती अर्धवट किंवा चुकीची भरत असल्याचंही समोर आली आहे. आता बेपत्ता रुग्णांचा शोध घ्यायचा कसा, असा मोठा प्रश्न महापालिकेसमोर उभा आहे. पालिका अधिकारी तसेच पोलिस बेपत्ता रुग्णांचा शोध घेत आहेत. कोरोना रुग्ण दिलेल्या पत्त्यावर राहत नाहीत तर अनेकांचा फोन बंद असल्याचं समोर आलं आहे. हेही वाचा..सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नका, धनंजय मुंडेंनी भाजप आमदारावर केला पलटवार महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित रुग्णांच्या नावांची यादी पोलिसांकडे सोपवली आहे. त्यानुसार पोलिस रुग्णांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन राबवत आहे. रुग्णांचा मोबाईलचं लोकेशन ट्रेस केलं जात असल्याचं पोलिस उपायुक्त प्रणय अशोक यांनी सांगितलं आहे.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    First published:

    Tags: #Mumbai, BMC, Corona, Corona virus, Coronavirus

    पुढील बातम्या