स्कायवाॅकवर रेलिंग तुटल्यामुळे अंध व्यक्ती पडून जखमी

तलर हे रेलिंगचा आधार घेत रुग्णालयाकडे जात होते, त्यांना तुटलेल्या रेलिंगचा अंदाज आला नाही आणि त्यांचा तोल जाऊन ते स्कायवॉकवरून थेट पार्क केलेल्या दुचाकींवर पडले.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: May 19, 2018 10:44 AM IST

स्कायवाॅकवर रेलिंग तुटल्यामुळे अंध व्यक्ती पडून जखमी

कल्याण,19 मे : कल्याणमधल्या एका स्कायवॉकवरून पडून एक अंध नागरिक जबर जखमी झालाय. बाबू तलर असं अंध व्यक्तीचं नाव आहे.  तलर हे रेलिंगचा आधार घेत रुग्णालयाकडे जात होते, त्यांना तुटलेल्या रेलिंगचा अंदाज आला नाही आणि त्यांचा तोल जाऊन ते स्कायवॉकवरून थेट पार्क केलेल्या दुचाकींवर पडले. त्यांच्या डोक्याला मार लागला आहे.

स्मार्ट सिटीची उत्तुंग स्वप्ने दाखविणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेत नागरिकांना मूलभूत सुविधा मिळविताना देखील तारेवरची कसरत करावी लागत आहे. स्टेशन परिसरातून बाहेर पडणाऱ्या नागरिकांना सुरक्षित बाहेर येता यावे यासाठी पालिका प्रशासनानेतब्बल 100 कोटी रुपये खर्चून उभारलेल्या स्कायवाकच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष देण्यास देखील प्रशासनाला वेळ नसल्यामुळे त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

बाबू तलर नावाची अंध व्यक्ती या स्काय वॉकच्या रेलिंगचा आधार घेत रुक्मिणीबाई रुग्णालयाकडे जात होता. मात्र तुटलेल्या रेलिंगचा अंदाज न आल्याने स्काय वाकच्या पायऱ्या समजून उतरायचा प्रयत्न करणाऱ्या तलर यांचा तोल गेल्याने ते थेट  स्कायवॉकवरून रस्त्यावर पार्किंग केलेल्या दुचाकीवर पडले. त्याना त्वरित रुक्मिणीबाई रुग्णालयत नेले  धक्कादायक बाब म्हणजे रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये जेव्हा बाबू यांना उपचारासाठी नेण्यात आले. तेव्हा व्हीलचेयर चालवणाऱ्या कर्मचारी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध नव्हता ते ही काम बाबू याच्या बहिणीला करावा लागला. या दुर्घटनेत बाबू जबर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला मार लागला असून यांना गंभीर दुखापत झाली आहे.

जखमी झालेला अंध व्यक्ती हा कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी परिसरात राहणारा असून, त्याला उपचारासाठी ठाणे येथील कळवा रुग्णालयात हलवण्यात आलंय. मात्र या दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला असून नागरिकांच्या त्रासाची प्रशासनाला परवा नसल्याचे स्पष्ट होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 19, 2018 10:44 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...