Home /News /maharashtra /

या परीक्षेत हुशार विद्यार्थ्यांनाही फुटतो घाम, पण दृष्टीहीन जयेशनं मिळवलं नेत्रदीपक यश!

या परीक्षेत हुशार विद्यार्थ्यांनाही फुटतो घाम, पण दृष्टीहीन जयेशनं मिळवलं नेत्रदीपक यश!

दृष्टीहिन असूनही जयेश यांनं चांगल्या चांगल्याच्या डोळ्यात अंजन घालणारी कामगिरी केली

ठाणे, 4 डिसेंबर: नेटची परीक्षा म्हणलं की, भल्या भल्या हुशार विद्यार्थ्यांना घाम फुटतो. रात्रंदिवस एक करुन मुलं अभ्यासामध्ये स्वत: ला अक्षरश: गाडून घेतात. तरीही नेटची परीक्षा पास होत नाहीत. पण दृष्टी नसतानाही नेटची परीक्षा पास करण्याचा विक्रम ठाण्यातील एका विद्यार्थ्यानं केला आहे. जयेश कारंडे अस नेत्रदीपक यश मिळवलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. दृष्टीहिन असूनही जयेश यांनं चांगल्या चांगल्याच्या डोळ्यात अंजन घालणारी कामगिरी केली आहे. हेही वाचा...लग्नाच्या तीन दिवस आधी नवरीला झाला कोरोना; तरीही पठ्ठ्याने जुगाड लावून केलं लग्न ठाण्याच्या लोकमान्य नगर पाडा नंबर तीनमधील जयेश कारंडे यांने पहिल्याच प्रयत्नात नेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. शालेय शिक्षण झाल्यानंतर जयेशने एमबीएचे शिक्षण देखील पूर्ण केलं आहे. आश्चर्य म्हणजे नेत्रहीन असलेला ठाण्याच्या जयेश एमबीएचं शिक्षण करुन थांबला नाही. तर त्यानं नेट सेट परीक्षेसाठी तयारी सुरु केली. लोकमान्य नगर परिसरात दाटीवाटीने असलेल्या चाळीमध्ये जयेश राहतो. दृष्टीहीन असूनही प्रचंड इच्छाशक्ती व जिद्दीच्या बळावर त्याने हे यश मिळवलं आहे. परीक्षेत रायटर घेऊन त्याने नेट सेटची परीक्षा दिली आणि त्यात तो चांगल्या गुणांनी उत्तीर्णही झाला. विशेष म्हणजे तेही पहिल्याच प्रयत्नात. याकरता जयेश सोबतच त्याच्या नातेवाईकांनी जयेश करता खूप परिश्रम घेतले. जयेशने नेट सेट करता स्वत: साठी एक विशिष्ट तयारी केली होती. त्यात तयारीच्या जोरावर जयेशनं हे यश संपादन केलं असल्याचं तो सांगततो. आता जयेश लवकरच प्राध्यापक म्हणून रुजू होणार आहे. ZP शाळेच्या शिक्षकाला मिळाला 7 कोटींचा पुरस्कार जाहीर दरम्यान, विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 7 कोटी (7 crores) रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर झाला आहे. जगातील सर्वोत्तम शिक्षक म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. आतापर्यंत देशातील कोणत्याही शिक्षकाला हा पुरस्कार मिळाला नाही. शिक्षक रणजितसिंह डिसले हे पुरस्कार मिळणारे पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. हेही वाचा..पुण्यातील जुन्नर हादरलं! माहेरी आलेल्या पत्नीनं पतीच्या टोक्यात घातलं दांडकं विशेष म्हणजे महाराष्ट्रातील एका ग्रामीण भागात ते ही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकाला हा पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचं खूप कौतुक केलं जात आहे. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील मेहनतीमुळे हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार सोलापूरातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना मिळाला आहे. या पुरस्कारासाठी त्यांना तब्बल 7 कोटी रुपयांचा निधीही मिळाला आहे. लंडन मधील नॅचरल हिस्ट्री म्युझियम येथे झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी याची अधिकृत घोषणा केली.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Thane

पुढील बातम्या