धक्कादायक !, आपल्याशी बोलत नसल्याचा राग धरून मुलीवर ब्लेडने हल्ला

धक्कादायक !, आपल्याशी बोलत नसल्याचा राग धरून मुलीवर ब्लेडने हल्ला

घरा शेजारी राहणारी मुलगी आपल्याशी बोलत नसल्याच्या राग मनात धरून एका माथेफिरू तरुणाने अल्पवयीन मुलीवर ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडलीय.

  • Share this:

19 जून : घरा शेजारी राहणारी मुलगी आपल्याशी बोलत नसल्याच्या राग मनात धरून एका माथेफिरू तरुणाने अल्पवयीन मुलीवर ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडलीय. घटनेत पीडित मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर तब्बल 45 टाके घालण्यात आले आहेत. पोलिसांनी आरोपी ओंकार  राऊतला अटक केली. ओंकार हा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतोय.

घरा शेजारी राहणारी मुलगी आपल्याशी बोलत नसल्याच्या राग मनात धरून, एका माथेफिरू तरुणीने अल्पवयीन मुलीवर ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना, पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे ,घटनेत पीड़ित मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिच्या जखमांवर तब्बल 45 टाके घालण्यात आले आहेत.

ओंकार राऊत,इंजिनिरियनग च्या शेवटच्या वर्षी शिक्षण घेत असलेल्या हा उच्च शिक्षित तरुणाकडे बघितल्यावर तो माथेफिरू आहे असंच कुणालाही वाटेल आणि ओंकारने कृत्य तसंच केलंय .आपल्या घराजवळ राहणाऱ्या या निरागस अल्पवयीन तरुणीवर ब्लेडने सपासप वार करून तो निघून गेला.

या आरोपीने केलेल्या हल्ल्यात ही मुलगी बचावली, मात्र घटनेची धास्ती अजुनही तिच्या मनात कायम आहे. पोलिसांनी घटनेच गांभीर्य ओळखून तात्काळ आरोपी ओंकारला अटक केले. मात्र एवढ्या शुल्लक कारणासाठी असे गंभीर गुन्हे घडत असतील तर ,यापुढे आपणही अधिक राहणार असल्याच पोलिसांनी मान्य केलं.

या आधीही केवळ दोनच महिन्यापूर्वी अश्याच प्रकारातून भाजपचे आमदार संजय रेड्डी बोदकुलवार यांच्या मुलीवरही एका माथेफिरूने हल्ला केला होता. ज्या मध्ये बोदकुलवार यांच्या मुलीचे बोट तुटून तिला कायमच अपंगत्व आलं,आता या पीड़ित मुली सोबतही तोच प्रकार घडला, त्यामुळे अस कृत्य करणाऱ्या विकृत मानसिकतेच्या ह्या गुन्हेगाराना, कायद्याची भीती वाटणार तरी कधी? हा प्रश्न या निमित्ताने उभा राहिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2017 09:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading