औरंगाबादमध्ये 'काळवीटा'ची शिकार करून पार्टी, सोशल मीडियावर PHOTO व्हायरल

औरंगाबादमध्ये 'काळवीटा'ची शिकार करून पार्टी, सोशल मीडियावर PHOTO व्हायरल

औरंगाबाद जिल्ह्यातील हनुमंतगाव येथे ही घटना घडल्याचं स्पष्ट झालंय. वनाधिकारी घटनेची चौकशी करत आहेत.

  • Share this:

औरंगाबाद 11 जुलै : वन्य प्राण्यांच्या शिकारीवर बंदी असताना आणि प्राणी वाचविण्याची मोहिम राबवली जात असतानाच औरंगाबादमधून एक धक्कादायक बातमी उघड झालीय. औरंगाबाद जिल्ह्यातील हनुमंतगाव येथे चक्क 'काळवीट'ची शिकार करून पार्टी करण्यात आली असल्याचं स्पष्ट झालंय. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय. ही पार्टी करणाऱ्यांना अटक करून कारवाई करा अशी मागणी होत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील हनुमंतगाव शिवारातही ही घटना आहे. 'काळवीट'चं एक पिल्लू शेतात आलं असताना काही युवकांनी पकडून त्याची हत्या केली आणि नंतर त्याचं मटण शिजवून पार्टी केली. त्या काळवीटाला शेतातल्या झोपडीमध्ये आणताना आणि कापतानाचे ते फोटो आहेत. पाऊस सुरू झाल्यामुळे सगळीकडे हिरवळ आहे. पाणीसाठेही निर्माण झालेत. कळपातून बाहेर पडून हे पिल्लू भटकलं असावं असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

'मला घरी येऊन अटक करा,' पत्नीचा खून करून पोलिसांना केला फोन

वन्य जीव कायद्याप्रमाणं काळवीटाची शिकार करण्यास बंदी आहे. त्याचबरोबर सध्या शेतात पीक नुकतच निघालंय. त्यामुळे काळवीटाने नुकसान केलं असाही युक्तिवाद करता येणार नाही. मटणासाठीच काळवीटाची शिकार करण्यात आल्याचं स्पष्ट होतं असं म्हटलं जातंय.

'खड्डे भरा नाहीतर त्याच खड्ड्यात ठेकेदाराला घालू '

मुसळधार पावसामुळे कोकणातल्या रस्त्यांची दैना उडालीय. आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांवर चिखलफेक केली आणि ते प्रकरण राज्यभर गाजलं. त्यांच्यावर प्रचंड टीकाही झाली आणि समर्थनही मिळालं. त्यानंतर आता शिवसेनेचे आमदार राजन साळवी अधिकाऱ्यांवर भडकले आहेत. राणेंनी राडा केला आणि कणकवलीतले रस्ते दुरुस्ती सुरू झाली मग राजापूरमधल्या रस्त्याची कामं का होत नाहीत असा सवाल साळवी यांनी केलाय. खड्डे भरा नाहीतर त्याच खड्ड्यात ठेकेदाराला घालू असा इशाराच त्यांनी दिला.

सरकारी भाषेत सांगून पाहिलं, आता शिवसेना स्टाईलमध्ये निघेल मोर्चा-उद्धव ठाकरे

KCC ही कंपनी  हायवेच्या चौपदरीकरणाचे काम करत आहे. प्रचंड पाऊस आणि मुंबई-गोवा हायवेचं सुरू असलेलं काम यामुळे रस्त्यावर प्रचंड खड्डे पडलेत. मात्र त्याची दुरुस्ती होत नाहीये. त्यामुळे लोकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागतंय. लोकांनी किती सहन करायचं. अधिकाऱ्यांकडे फंड असताना ते कामं करत नाहीत फक्त पैसे लुटण्याचं काम सुरू असतं असा आरोपही साळवी यांनी केला. कार्यकर्त्यांसह त्यांनी आज सकाळी रस्त्यांची पाहणी केली त्यानंतर त्यांनी आपला राग व्यक्त केला.

First published: July 11, 2019, 6:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading