मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Black Water Price : विराट कोहली, अंबानी पितात हजारो रुपये किंमतचे 'ब्लॅक वॉटर' असलं काय आहे त्यात

Black Water Price : विराट कोहली, अंबानी पितात हजारो रुपये किंमतचे 'ब्लॅक वॉटर' असलं काय आहे त्यात

हजारो रुपये किंमत असूनही 'ब्लॅक वॉटर'ची मागणी वाढत का आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती

हजारो रुपये किंमत असूनही 'ब्लॅक वॉटर'ची मागणी वाढत का आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन विराट कोहली, उद्योगपती नीता अंबानी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी हे पाणी पितात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 20 जानेवारी : मानवी शरीरात सुमारे 60 टक्के पाणी असतं. शरीरातील अंतर्गत यंत्रणा सुरळीतपणे चालण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतं. तसंच, पाण्यामुळे आपण जे अन्न खातो ते पचण्यास मदत होते. म्हणून, पुरेशा प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. साधं पाणी तर आपण सगळेच पितो.

मात्र, काही सेलिब्रिटी 'ब्लॅक वॉटर' पितात, असं तुम्ही ऐकलं असेल. काही वर्षांपूर्वी 'ब्लॅक वॉटर' हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय होता. भारतीय क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन विराट कोहली, उद्योगपती नीता अंबानी यांच्यासह अनेक सेलिब्रिटी हे पाणी पितात. या पाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत. म्हणून अनेकांनी त्याच्या किमतीकडे दुर्लक्ष करून आपल्या दिनचर्येत या पाण्याचा समावेश केला आहे. 'न्यूज एनसीआर'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हे ही वाचा : दुष्काळी भागात पिकवली स्ट्रॉबेरी! आज करतोय लाखोंची कमाई, पाहा PHOTO

ब्लॅक वॉटरला अल्कलाइन वॉटर असंही म्हणतात. ज्या व्यक्ती तासनतास जिममध्ये जातात आणि फिटनेससाठी कठोर परिश्रम करतात, अशा लोकांमध्ये हे पाणी खूप लोकप्रिय झालं आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींपासून आतापर्यंत जगभरातील अनेक खेळाडूंनी याला प्राधान्य द्यायला सुरुवात केली आहे. असं मानलं जातं की, हे पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच पीएच लेव्हलदेखील संतुलित ठेवतं. त्यामुळे अॅसिडिटीची समस्या उद्भवत नाही.

ब्लॅक वॉटरला एनर्जी ड्रिंक, स्पोर्ट्स ड्रिंक, फुलविक ड्रिंक, नॅचरली अल्कलाइन वॉटर आणि हेल्थ ड्रिंक म्हणूनदेखील ओळखलं जातं. डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ब्लॅक वॉटर हा शब्द विशिष्ट प्रकारच्या पाण्यासाठी वापरला जातो ज्यामध्ये फुलविक अॅसिड (FvA) असते. कधीकधी त्यात इतर खनिजं आणि जीवनसत्त्वंदेखील असतात.

सामान्य पिण्याच्या पाण्याची पीएच पातळी 6.5 ते 7.5 असते. जी हंगामावर, पाणी कोठून येत आहे आणि जीवाणू काढून टाकण्यासाठी त्यावर प्रक्रिया कशी केली जाते यावर अवलंबून असते. तर, ब्लॅक वॉटर किंवा अल्कलाइन वॉटर हे आयोनाईज्ड पाणी असतं, जे त्याचं शुद्ध स्वरूप आहे.

यामध्ये पीएच लेव्हल ही 7.5 असते आणि या केसमध्ये शरीरावरचं अवलंबित्व कमी असतं.यामध्ये नैसर्गिक अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे शरीरातील जास्त ऑक्सिडेटिव्ह काढून टाकतात. हे पाणी मायक्रो क्लस्टर केलेलं असतं आणि शरीराच्या पेशींद्वारे ते सहज ओळखलं जातं. त्यामुळे शरीरात हायड्रेशन खूप जास्त टिकते.

ब्लॅक वॉटर हे आरोग्यासाठी चांगले आहे यावर काही तज्ज्ञांचा अजिबात विश्वास नाही. 1980 पासून क्लोरीनेशन उद्योगाचा भाग असलेल्या रविचंद्रन यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं की, अल्कलाइन वॉटर हे आरोग्यासाठी चांगलं आहे. पण, त्यामुळे फारसा फरक पडत नाही. सध्या सुरू असलेली क्रेझ फक्त मार्केटिंग आहे.

हे ही वाचा : Prajakta Mali: नायिका म्हणून प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या प्राजक्ताने पटकावला सर्वोत्कृष्ट खलनायिकेचा पुरस्कार

ब्लॅक वॉटर प्यायल्यानं लोक तरुण दिसतात, असा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. विराट कोहली पीत असलेल्या पाण्याच्या एका बाटलीची किंमत चार हजार रुपये आहे. साधारण पाण्याच्या बाटलीची किंमत 20 ते 30 रुपयांपर्यंत असते. त्याचबरोबर काही ई-कॉमर्स साइटवर अर्धा लिटर ब्लॅक वॉटरच्या बाटलीची किंमत 90 रुपये देण्यात आली आहे.

First published:

Tags: Drink water, Nita ambani, Virat kohli