मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

स्मशानभूमीत रात्रीस खेळ चाले, संपूर्ण परिसरात लिंबू-हळदीचा सडा, बुलडाण्यातील भयंकर घटना

स्मशानभूमीत रात्रीस खेळ चाले, संपूर्ण परिसरात लिंबू-हळदीचा सडा, बुलडाण्यातील भयंकर घटना

 स्मशानभूमीला करणी केली असेल किंवा कुणी भानामातीचा हा प्रकार असल्याचं बोलत आहेत.

स्मशानभूमीला करणी केली असेल किंवा कुणी भानामातीचा हा प्रकार असल्याचं बोलत आहेत.

स्मशानभूमीला करणी केली असेल किंवा कुणी भानामातीचा हा प्रकार असल्याचं बोलत आहेत.

    राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा, 15 ऑगस्ट : देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला जात आहे. पण दुसरीकडे बुलडाण्यामध्ये (buldhana) एक अघोरी कृत्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खामगाव तालुक्यामध्ये अज्ञात व्यक्तीने कुंकू, लिंबू आणि हळदीने पूर्ण स्मशानभूमीत (Cemetery ) पुजली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या पारखेड गावातील हिंदू स्मशानभूमीत हा अघोरी प्रकार समोर आला आहे.  कुणीतरी अज्ञात व्यक्तीने कुंकू, लिंबू आणि हळदीने पूर्ण स्मशानभूमीत पुजली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मात्र कुणी आणि का ? असा प्रकार केला याबाबत कुठलीच माहिती अद्याप समोर आली नसली तरी या घटनेने गावकरी चांगलेच धास्तावले आहे. गावातील या स्मशानभूमीच्या मुख्य मार्गावर हळद कुंकू आणि लिंबाचा सडा पडलेला आहे. रस्त्याच्या बाजूला कुंकू आणि हळदीने पूजा केल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली.  स्मशानभूमीत एकच बघ्यांची गर्दी झाली होती. पण, पुढे जाण्याची कुणाचीही हिंमत होत नव्हती. (आमदार संतोष बांगर यांची दंबगगिरी, व्यवस्थापकाच्या लगावली कानशिलात LIVE VIDEO) भयंकर भीतीचे वातावरण गावकऱ्यांमध्ये पसरविण्यात या अघोरी कृत्य करणाऱ्याला यश आले आहे. कुणी तरी स्मशानभूमीला करणी केली असेल किंवा कुणी भानामातीचा हा प्रकार असल्याचं बोलत आहेत. या घटनेने अजूनही पुरोगामी म्हणवणाऱ्या या ग्रामीण महाराष्ट्रात अंधश्रध्देचा प्रचंड पगडा असल्याचं पाहायला मिळत आहे.  कुठलीही भानामती किंवा करणी कुंकू आणि निंबू हळदीने केली जात नसते यावर अजूनही ग्रामीण महाराष्ट्रातील लोक तयार का नाहीत ? असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित केला जात आहे. (मेटेंच्या अपघातानंतर रोड हिप्नोसिस चर्चेत; या कारणाने झाला होता का अपघात?) राज्यात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असताना अजून जनसामान्यांपर्यंत हा कायदा पोहचवण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी ठरताना दिसत आहे. त्यामुळेच की काय असल्या भानगडी खोर मानसिकतेचे साधले जात आहे.
    First published:

    पुढील बातम्या