इथे उघड झाला अघोरी प्रकार..आढळली तीन निष्पाप प्राण्यांचे शीर, नारळ अन् लिंबू

इथे उघड झाला अघोरी प्रकार..आढळली तीन निष्पाप प्राण्यांचे शीर, नारळ अन् लिंबू

कवठे यमाई गावाजवळील ढाके वस्तीजवळ पुन्हा एकदा उतारे टाकण्याचा अघोरी प्रकार घडला आहे. या उताऱ्यात तीन बकऱ्याची कापलेले शीर त्याला लिंबाचे घातलेला हार तसेच दोन साड्या, दोन जोडी शर्ट पॅट, टॉवेल टोपी, या सर्वाला हार घातलेले नारळ त्यावर हळदी कुंकू टाकून पूजा करण्यात आलेल्या खळबळ उडाली आहे.

  • Share this:

रायचंद शिंदे (प्रतिनिधी)

शिरुर, 2 मे - तालुक्यातील कवठे यमाई गावाजवळील ढाके वस्तीजवळ पुन्हा एकदा उतारे टाकण्याचा अघोरी प्रकार घडला आहे. या उताऱ्यात तीन बकऱ्याची कापलेले शीर त्याला लिंबाचे घातलेला हार तसेच दोन साड्या, दोन जोडी शर्ट पॅट, टॉवेल टोपी, या सर्वाला हार घातलेले नारळ त्यावर हळदी कुंकू टाकून पूजा करण्यात आलेल्या खळबळ उडाली आहे. तसेच गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सहा महिन्यांपूर्वी शिरुर तालुक्यातील मलढण या गावीही उतारे टाकण्यात आले होते. त्यात गावातील लोकांची नावे लिहुन त्यावर रक्ताचे थेंब लावण्यात आले होते. या संदर्भात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीतर्फे त्या ठिकाणच्या लोकांचे प्रबोधन करुन त्यांच्या मनातील भीती दूर करण्यात आली होती.

परंतु पुन्हा सतत असे प्रकार शिरुर तालुक्यात घडत आहे. अशा अनेक तक्रारी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडे येत आहेत. तरी पोलीस प्रशासनाने यात वेळीच लक्ष घालणे गरजेचे आहे.कदाचित उद्या या भागात असणारे बाबा, तांत्रिक, मांत्रिकातर्फे करणीची, जादुटोण्याची भीती घालून आज बकऱ्याचे बळी देण्याचा सल्ला दिला. उद्या नरबळी देण्याचाही सल्ला दिला जाऊ शकतो. अशा घटना परत घडू नये, यासाठी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक तसेच शिरुर पोलीस अधिकाऱ्यांनी वेळीच लक्ष घालून अशा अनुचित, अघोरी घटनांना वेळीच आळा घालण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नागरिकांच्या मनातील भीती दूर करणे आवश्‍यक आहे.

जादुटोणा विरोधी कायद्याअंतर्गत प्रत्येक पोलीस स्टेशनला दक्षता अधिकारी नेमण्यात आलेला आहे. त्या अधिकाऱ्यांना कायद्यांतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करुन आपल्या भागात असणाऱ्या बाबा, मांत्रिक, तांत्रिकांची माहीती घेऊन वेळीच कठोर कारवाई करण्याची गरज आहे.लवकरच या गावात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यक्रम घेऊन लोकांचे प्रबोधन करण्यात येईल.गावातील लोकांनी घाबरुन जाऊ नये. असे उतारे टाकून कोणी कोणाचे बरे किंवा वाईट करु शकत नाही, असा अघोरी सल्ला कोणी दिला तरी त्याला बळी पडू नका.

- नंदिनी जाधव, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती, पुणे.

गडचिरोली हल्ल्याची धक्कादायक माहिती समोर, घटनास्थळावरचा पहिला VIDEO

First published: May 2, 2019, 4:06 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading