मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सैतानाचा अवतार सांगत महिलेला नग्न करून बळी देण्याचा प्रयत्न, बारामतील घटना

सैतानाचा अवतार सांगत महिलेला नग्न करून बळी देण्याचा प्रयत्न, बारामतील घटना

 आरोपींकडून लिंबू उतरणे, अंगारे-धुपारे टाकणे, भस्म लावणे, अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडणे, उपाशी ठेवणे असे प्रकार केले गेले.

आरोपींकडून लिंबू उतरणे, अंगारे-धुपारे टाकणे, भस्म लावणे, अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडणे, उपाशी ठेवणे असे प्रकार केले गेले.

आरोपींकडून लिंबू उतरणे, अंगारे-धुपारे टाकणे, भस्म लावणे, अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडणे, उपाशी ठेवणे असे प्रकार केले गेले.

बारामती, 22 ऑक्टोबर : 'महिलेला सैतानाचा (evil) अवतार असल्याचे समजत मांत्रिकाच्या सल्ल्याने तिला नग्न करत अघोरी (witchcraft) कृत्य करत तिचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याची घटना बारामती (baramati) तालुक्यातील करंजेपूल येथे घडली आहे. या प्रकरणी तिच्या सासरच्या चौघांसह मांत्रिक अशा पाचजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करंजेपूलला राहणाऱ्या पीडित महिलेने याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. महेंद्र गायकवाड व राजेंद्र गायकवाड हे महिलेचे दीर असून कौशल्या या सासू आहेत.  पीडितेचा विवाह झाल्यापासून सासू व दीराकडून लग्नात हुंडा जास्त न दिला नाही या कारणावरून तिचा छळ केला जात होता. वारंवार पीडितेला मारहाण केली जात होती. 'जरडेश्वर'सोबत आणखी 32 कारखाने मग सोयीचं का झाकून ठेवायचं? - राजू शेट्टी काही दिवसांपूर्वी नणंद माहेरी आल्यानंतर तिनेही त्यांना भरीस घातले. दोन्ही दीर व सासूने तिला भूतबाधा झाली असल्याचे पसरवत होते. त्यानंतर तात्या नामक मांत्रिकाला घरी बोलावले. त्याने सांगितल्यानुसार आरोपींकडून लिंबू उतरणे, अंगारे-धुपारे टाकणे, भस्म लावणे, अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडणे, उपाशी ठेवणे असे प्रकार केले गेले. अखेर या जाचाला कंटाळून पीडितेने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून बारामती शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला.  या प्रकरणी महेंद्र माणिकराव गायकवाड, राजेंद्र माणिकराव गायकवाड, कौशल्या माणिकराव गायकवाड (सर्व रा. करंजेपूल, ता. बारामती), नणंद निता अनिल जाधव (रा. चाकण, ता. खेड) व तात्या नावाचा मांत्रिक (नाव, पत्ता माहित नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. PUBG : पबजी लवर्ससाठी Good News! भारतात या तारखेपासून PUBG New State होणार रिलीज बारामती शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायद्यासह जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण आता वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला वर्ग करण्यात आले आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Baramati

पुढील बातम्या