Home /News /maharashtra /

राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून बच्चू कडूंची नौटंकी सुरु, भाजप महिला नेत्याचा घणाघात

राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून बच्चू कडूंची नौटंकी सुरु, भाजप महिला नेत्याचा घणाघात

पावसामुळे विदर्भाचे प्रचंड नुकसान झाले असतांना तुटपुंजी मदत देण्यात आली.

अमरावती, 6 डिसेंबर: राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू (Bacchu kadu) हे हजारो शेतकऱ्यांना घेऊन दिल्लीतील किसान मोर्चाला (Farmer Agitation delhi) समर्थन देण्यासाठी दुचाकी व चारचाकी वाहनाने मोर्चा घेऊन निघाले आहेत. बच्चू कडूंनी आधी राज्यातील शेतकऱ्यांवर लक्ष द्यावं, अशी टीका भाजपनं केली आहे. बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून मोझरी येथे गुरुकुंजवर आज रविवारी भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे (BJP Leader Nivedita Dighane) यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आलं. उद्या भाजपचे कार्यकर्ते बच्चू कडू यांच्या बेलोरा गावात आंदोलन करणार आहेत. हेही वाचा...भाजपला रोखण्यासाठी गोव्यातही ‘महाराष्ट्र पॅटर्न’?, काँग्रेसला मात्र भीती! राज्यमंत्री बच्चू कडू हे केंद्र सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांना भडकवीत असून महाराष्ट्र सरकाराने सत्तेत आल्यापासून कायम शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित ठेवले आहे. 25 हेक्टर मदत शेतकऱ्यांना देण्यात येणार होती परंतु मदत मिळाली नाही. दूध दरवाढ देण्यात आली नाही. पावसामुळे विदर्भाचे प्रचंड नुकसान झाले असतांना तुटपुंजी मदत देण्यात आली. तेव्हा राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून बच्चू कडू हे नौटंकी आंदोलन करत असल्याचं भाजपनं घणाघाती टीका केली आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचा निषेध केला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान, केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर पंजाब आणि हरियाणातील हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी बच्चू कडू चक्क मोटरसायकलनं दिल्लीला रवाना झाले आहेत. भाजप सरकारच्या कृषी विधेयका वरून हरियाणा आणि पंजाब येथील शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करत आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आता महाराष्ट्रातही शेतकरी रस्त्यावर यायला लागले आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वात दोन हजार शेतकरी मोटरसायकलने व चारचाकी वाहनाने अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथून दिल्लीला रवाना झाले आहेत. दुसरीकडे, शिवसेनेनंही या आंदोलनात पाठिंबा द्यावा, या मागणीसाठी शिरोमणी अकाली दलाचे नेते आणि खासदार प्रेम सिंग चंदूमाजरा यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. अकाली दलाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना शेतकरी आंदोलनाबद्दल माहिती दिली. तसंच या आंदोलनात शिवसेनेनं पाठिंबा देऊन सहभागी व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अकाली दलाच्या नेत्यांना आश्वासन देत पुढील दोन आठवड्यात दिल्लीला येणार असल्याचे सांगितले आहे. हेही वाचा...चंद्रकांतदादांनी शिवसेनेला शिताफीनं टाळलं, पण शरद पवारांवर केला चतुराईनं पलटवार त्याबरोबर शरद पवार यांनी देखील कृषी कायदा रद्द करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पुढील दोन दिवसांत शरद पवार हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. शरद पवार यांच्यासह काही नेते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची 9 डिसेंबर रोजी दिल्लीत भेट घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. ही भेट कृषी कायदा विरोधाच्या संदर्भात असणार आहे. कृषी कायद्याविरोधात शरद पवार हे राष्ट्रपतींकडे नवी भूमिका मांडणार असल्याची शक्यता आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

पुढील बातम्या