Home /News /maharashtra /

सांगलीत राडा, भाजप जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्याची तोडफोड, पती-दिराला मारहाण

सांगलीत राडा, भाजप जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्याची तोडफोड, पती-दिराला मारहाण

याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या सभापतीसह जिल्हा परिषदेच्या पाच सदस्यांवर तक्रार दाखल करण्यात आली

सांगली, 24 जानेवारी : सांगली जिल्हा परिषदेत (Sangli Zilla Parishad) एका टेंडरच्या वादातून सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या बंगल्यात जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यामधील साहित्याची तोडफोड करण्यात आलेली आहे. राड्या दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पती, दिराला मारहाण देखील झाली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या सभापतीसह जिल्हा परिषदेच्या पाच सदस्यांवर तक्रार दाखल करण्यात आली आहे तर इतर सदस्यांनी टेंडर संदर्भात आम्हालाच बोलावून घेऊन स्वतःचं तोडफोड केली आहे, असा आरोप केला आहे. सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे (Sangli Zilla Parishad President Prajakta Kore) यांच्या शासकीय निवासस्थानी जोरदार राडा झाल्याची घटना घडली आहे. सत्ताधारी भाजपच्या सभापती व जिल्हा परिषद सदस्यांनी मिळून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांचे यांचे पती आणि दिर यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसंच या राड्या दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्षाच्या बंगल्या मधील साहित्याची तोडफोड करण्यात आली आहे.एका टेंडरच्या वादातून हा राडा झाल्याचं सांगण्यात येत आहे. (अकोल्यात सावत्र बापाचं किळसवाणं कृत्य; मुलगी गर्भवती झाल्यानंतर खुलासा!) दरम्यान, या मारहाण प्रकरणी जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे पती नंदू कोरे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये जिल्हा परिषदेचे भाजपचे समाज कल्याण सभापती प्रमोद शेंडगे, भाजपच्या महिला बाल कल्याण सभापती सुनिता पवार यांचे पती सुनील पवार, शिक्षण व आरोग्य सभापती आशा पाटील यांचे पती  सुनील पाटील, भाजपचे अरुण बालटे, अपक्ष सदस्य संभाजी कचरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरापर्यंत या गुन्हा दाखल झालेल्या पाच सदस्यांच्याकडून कोरे यांच्या विरोधातही तक्रार देण्याचं प्रक्रिया सुरू होते. (अजितदादा आणि आदित्य ठाकरेंचं 'मिशन मुंबई', 650 कोटींच्या निधीला मंजुरी) जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या पती विरोधात व विरोधात क्रॉस कम्पलेट दाखल करण्यासाठी प्रमोद शेंडगे सभापती विश्रामबाग पोलीस ठाणे या ठिकाणी दाखल करण्यासाठी आले असता त्यांनी अध्यक्ष यांचे पती व दीर यांनीच आम्हाला मारहाण केली आहे  आणि आमच्या विरोधात खोटी तक्रार दिले आहे असा आरोप केला आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या