वसई, 7 जून: नायगाव परिसरात भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीनं किरकोळ कारणावरून सुरक्षारक्षकाला मारहाण केली आहे. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. प्रियदर्शनी किशोर भुसा असे सुरक्षारक्षकाला मारहाण करणाऱ्या महिलेचे नाव आहे. त्या भाजपचे वसई पूर्वचे तालुका अध्यक्ष किशोर भुसा यांच्या पत्नी आहेत. नायगाव पूर्व रश्मी स्टार सिटी या इमारतीत 4 जून रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही घटना घडलीय. या घटनेवर सोसायटीतील रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.