मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नितीन राऊत यांच्या ताफ्यावर भाजप कार्यकर्त्यांनी भिरकावली वीजबिलं, LIVE VIDEO

नितीन राऊत यांच्या ताफ्यावर भाजप कार्यकर्त्यांनी भिरकावली वीजबिलं, LIVE VIDEO

नितीन राऊत यांचा ताफा येत असलेल्या मार्गावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आधीपासून गर्दी केली होती.

नितीन राऊत यांचा ताफा येत असलेल्या मार्गावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आधीपासून गर्दी केली होती.

नितीन राऊत यांचा ताफा येत असलेल्या मार्गावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आधीपासून गर्दी केली होती.

जालना,  17 डिसेंबर : 'वीज ही फुकट मिळत नाही, त्यामुळे वीजबिलं (electricity bills) भरावीच लागणार' असं स्पष्ट मत ऊर्जामंत्री नितीन राऊत (nitin raut) यांनी व्यक्त केल्यामुळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. अशातच जालन्यात (jalana) नितीन राऊत यांच्या ताफ्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी (bjp workers) वीजबिलं फिरकावल्याची घटना घडली आहे.

जालन्यातील बदनापूर शहरात ही घटना घडली. आज नितीन राऊत हे बदनापूरमध्ये नगर पंचायत निवडणुकीनिमित्त महविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारासाठी बदनापूर शहरात दाखल झाले होते.

यावेळी सक्तीच्या वीज बिलाविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांना राऊत यांच्या ताफ्यावर वीजबिल फेकली. भाजपा युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी ऊर्जा मंत्री राऊत यांचा ताफा देखील अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांच्या ताफ्यावर वीजबिलं फेकण्यात आली.

हेही वाचा  - Motilal Oswal ची 'या' फर्टिलायझर शेअरला BUY रेटिंग, 40 टक्के परताव्याची शक्यता

नितीन राऊत यांचा ताफा येत असलेल्या मार्गावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आधीपासून गर्दी केली होती. राऊत यांचा ताफा जवळ येताच भाजप कार्यकर्त्यांनी नितीन राऊत यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आणि वीजबिल माफीची मागणी करण्यात आली.

दरम्यान, भाजपच्या या आंदोलनांबद्दल नितीन राऊत यांना विचारलं असता, 'हवा घ्यायलाही पैसे लागतात तर वीजबिल कसं माफ करणार' असं अजब वक्तव्य ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे. तसंच, 'कोरोनाच्या काळात तुम्ही कुणाची विज वापरली' असा सवालही राऊत यांनी विचारला.

First published:

Tags: नितीन राऊत