भाजप कार्यकर्त्यांना अतिउत्साह नडला, पोलीस स्टेशनमध्ये फवारणी करणे पडले महागात!

भाजप कार्यकर्त्यांना अतिउत्साह नडला, पोलीस स्टेशनमध्ये फवारणी करणे पडले महागात!

गरजूंना अन्नधान्याची मदत किंवा परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी महापालिकेच्या मार्फतच करण्याच्या आदेश आहे.

  • Share this:

पनवेल, 13 एप्रिल : कोरोना व्हायरसमुळे राज्यात हाहाकार उडाला आहे. राज्य सरकारने सर्व नागरिकांनी घरीच राहण्याचे आवाहन केलं आहे. रस्त्यांवर अडकलेल्या गरजूंना लोकं मदतीसाठी पुढे सरसावले आहे. परंतु, पनवेलमध्ये अवैधरित्या परिसरात निर्जंतुकीरण करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पनवेलमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर कामोठे पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. अवैधरित्या परिसरात निर्जंतुकीरण केल्याने पनवेल मनपाने हा गुन्हा दाखल केला आहे. भाजप कार्यकर्ता हॅपी सिंग यांच्या सोबत इतर 4 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - COVID-19: लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात मिळणार थोडीफार सूट, हा आहे सरकारचा प्लान

गरजूंना अन्नधान्याची मदत किंवा परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी महापालिकेच्या मार्फतच करण्याच्या आदेश आहे. पण, असं असतानाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात पालिकेच्या नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे या कार्यकर्त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

धक्कादायक म्हणजे, या महाभागांनी कामोठे परिसरासोबतच कामोठे पोलीस स्थानकात देखील निर्जंतुकीकरणची फवारणी करीत संचारबंदीच्या नियमांचे ही उल्लंघन केलं आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांनी ज्या पोलीस स्टेशनमध्ये फवारणी केली होती. त्याच पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.

डीमार्टच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी केली मारहाण

दरम्यान, नवी मुंबईत एक संतापजनक घटना घडली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या डीमार्टच्या कर्मचाऱ्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार नवी मुंबईत घडला आहे.

हेही वाचा -रामायणातील 'त्या' प्रसंगातून सेहवागला मिळाली बॅटिंगची प्रेरणा?

नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर 4 मधील अमेय सोसायटीमध्ये सोसायटीच्या सदस्यांनी एकत्र येत डीमार्ट मधून जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा मागितला होता. त्यानंतर डीमार्टचा टेम्पो सामान घेऊन सोसायटी आवारात आला असता सामान उतरवतेवेळी पोलिसांनी मारहाण केली. सोसायटीचे सदस्य देखील बाहेर न जाता सोसायटी आवारातच सोशल डिस्टनसिंग ठेवत सामान खरेदी करत असताना देखील पोलिसांची मुजोरी पाहायला मिळाली.

यावेळी काँग्रेसच्या रवींद्र सावंत यांनी पोलिसांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. नेरुळ पोलिसांनी केलेल्या या मारहाणीच्या विरोधात नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. एका बाजूला मॉलमध्ये हजारोंच्या संख्येने लोकं जमा होत आहेत, म्हणून ही संकल्पना राबवली. मात्र त्याला पोलिसांनी विरोध केला. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

संपादन - सचिन साळवे

First published: April 13, 2020, 2:13 PM IST

ताज्या बातम्या