धनंजय मुंडेंविरुद्ध गुन्हा दाखल करा, परळीत पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते आक्रमक

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 19, 2019 10:48 PM IST

धनंजय मुंडेंविरुद्ध गुन्हा दाखल करा, परळीत पंकजा मुंडेंचे कार्यकर्ते आक्रमक

सुरेश जाधव, बीड, 19 ऑक्टोबर : राष्ट्रवादीचे नेते आणि परळीतून विधानसभा निवडणुकीला उभे असलेले धनंजय मुंडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरून परळीत भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा संताप पसरला आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने धनंजय मुंडेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

धनंजय मुंडे यांनी केज तालुक्यातील विंडयाच्या सभेत पंकजा मुंडे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकाला घेराव घालत घोषणाबाजी केली. अद्याप याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मात्र परळीत सध्या तणावाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे.

पंकजा मुंडे यांना भर सभेत भोवळ

भाजपच्या नेत्या आणि परळीतील उमेदवार पंकजा मुंडे यांना आपल्या प्रचाराच्या अखेरच्या सभेत भोवळ आली. भोवळ येऊन स्टेजवर कोसळलेल्या पंकजा मुंडे यांना नंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. पंकजा मुंडे यांच्या प्रकृतीबाबत त्यांच्या बहीण आणि खासदार प्रितम मुंडे यांनी माहिती दिली आहे.

'सोशल मीडियातील काही गोष्टींमुळे ताई अस्वस्थ आहेत. साधा आणि सरळ स्वभाव असल्याने तिला हे सगळं सहन होत नाही. हे लोक प्रचंड घाणेरडं वागत असल्यानं ताईंना ते सहन झालं नाही. काल रात्रीपासूनच त्या अस्वस्थ होत्या. ताईंनी सांगितलंय की आता सगळ तुमच्या हातात आहे,' अशी माहिती पंकजा मुंडे यांच्या बहीण प्रितम मुंडे यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2019 10:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...