मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

नारायण राणेंच्या यात्रेमध्ये राडा, हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतल्यामुळे BJP कार्यकर्ते संतापले, VIDEO

नारायण राणेंच्या यात्रेमध्ये राडा, हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतल्यामुळे BJP कार्यकर्ते संतापले, VIDEO

वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता होती. भाजपने गेल्या निवडणुकीत त्यांच्याविरोधात निवडणुका लढल्या होत्या.

वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता होती. भाजपने गेल्या निवडणुकीत त्यांच्याविरोधात निवडणुका लढल्या होत्या.

वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता होती. भाजपने गेल्या निवडणुकीत त्यांच्याविरोधात निवडणुका लढल्या होत्या.

  • Published by:  sachin Salve
विरार, 21 ऑगस्ट : केंद्रीयमंत्री नारायण राणे (narayan rane) यांची जन आशीर्वाद यात्रा आज विरारमध्ये (virar) सुरू आहे. या यात्रेदरम्यान चक्क राणे यांनी आमदार हितेंद्र ठाकूर ((hitendra thakur)  आणि क्षितीज ठाकूर यांची भेट घेतली. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या जन आशिर्वाद यात्रे दरम्यान विरारच्या आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विवा कॉलेजच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्यामुळे काही भाजप कार्यकर्त्यांना आत जाता न आल्याने काही कार्यकर्ते संतापले. हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यालयाच्या बाहेर जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी भारत माता की जय च्या घोषणा दिल्या. तर काही कार्यकर्त्यांनी ज्यांनी आपल्या विरोधात निवडणूक लढवली त्यांची भेट का घेतली, असं म्हणत थेट नारायण राणे, निलेश राणे यांच्यासमोरच जाब विचारत घोषणाबाजी केली. आणखी एका ज्वेलर्सची हत्या, भर दिवसात दुकानात घुसून केले सपासप वार, VIDEO विशेष म्हणजे, वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता होती. भाजपने गेल्या निवडणुकीत त्यांच्याविरोधात निवडणुका लढल्या होत्या. त्यामुळे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर यांची भेट घेतल्याने नाराज झाले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. मात्र, नारायण राणे यांनी ही भेट मैत्रीची असल्याचं सांगितलं. नारायण राणेंची एकनाथ शिंदेंना ऑफर दरम्यान, आज नालासोपाऱ्यात पत्रकारांशी बोलत असताना नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला. 'शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे फक्त नावापुरते मंत्री राहिले आहे. एकही फाईल एकनाथ शिंदे यांना 'मातोश्री'ला विचारल्या शिवाय सही करता येत नाही. ते शिवसेनेत कंटाळले आहे, मी त्यांना फोन करणार आहे, जर ते आमच्याकडे आले तर स्वागतच आहे, असा दावाच राणे यांनी केला. तसंच, आमदार नीलम गोऱ्हे यांना मी शिवसेनेतं आणलं. त्यांच्या आमदारकीसाठी मी प्रयत्न केले. आता त्यांची त्यांच्याच पक्षात किती फरफट होत आहे, ते पहा म्हणावे, असा टोलाही राणेंनी लगावला.
First published:

पुढील बातम्या