मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

भाजप कार्यकर्त्यांची अशी बनवेगिरी, आंदोलनात कर्जच नसलेल्या शेतकऱ्यांना केलं हजर

भाजप कार्यकर्त्यांची अशी बनवेगिरी, आंदोलनात कर्जच नसलेल्या शेतकऱ्यांना केलं हजर

उस्मानाबादमध्ये आंदोलन करताना भाजपच्या उत्साही कार्यकर्त्यानी चक्क आंदोलनांचीच फसवेगिरी केल्याचा प्रकार घडला आहे.

उस्मानाबादमध्ये आंदोलन करताना भाजपच्या उत्साही कार्यकर्त्यानी चक्क आंदोलनांचीच फसवेगिरी केल्याचा प्रकार घडला आहे.

उस्मानाबादमध्ये आंदोलन करताना भाजपच्या उत्साही कार्यकर्त्यानी चक्क आंदोलनांचीच फसवेगिरी केल्याचा प्रकार घडला आहे.

उस्मानाबाद, 25 फेब्रुवारी : सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारविरोधात भाजप अधिक आक्रमकपणे मैदानात उतरली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभरात भाजपकडून सरकार विरोधात आंदोलन सुरू आहे. पण, उस्मानाबादेत भाजपच्या उतावळ्या कार्यकर्त्यांनी चक्क फसवेगिरी केल्याचं समोर आलं आहे.

राज्यभरात आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात  धरणे आंदोलन करण्यात येत आहे. पण उस्मानाबादमध्ये आंदोलन करताना भाजपच्या उत्साही कार्यकर्त्यानी चक्क आंदोलनांचीच फसवेगिरी केल्याचा प्रकार घडला आहे. सरकारच्या कर्जमाफीचा निषेध करण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यानी चक्क ज्या शेतकऱ्यांच्या नावावर कर्जच नाही, अश्या शेतकऱ्यांना आंदोलनात सहभागी केलं. एवढंच नाहीतर  शेतकऱ्यांना प्रतिकात्मक कोरे सात बारे उतारे दिले आहेत.

भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनीच चक्क प्रतिकात्मक कोरे सात बारे वाटले आहेत. जिल्ह्यात अनेक शेतकरी असताना भाजपला आंदोलन करताना कर्जदार शेतकरी मिळाले नाहीत का? कशeमुळे ही आंदोलनाची भपंकबाजी केली असल्याची चर्चाच  या आंदोलनच्या ठिकाणी रंगली होती.

मुंबईतील आंदोलनात फडणवीस आणि पाटील सहभागी

दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आझाद मैदानावर आंदोलनात सहभागी झाले. 'उद्धवजी तुम्ही बांधावर जाऊन शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं. तरीही अजून संपूर्ण कर्जमाफी झाली नाही. याची आठवण फडणवीसांनी करून दिली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनीही ठाकरे सरकारला चांगलंच फैलावर घेतलं. 'देवेंद्रजी, तुम्ही उद्धवजींना कर्जमाफी म्हणजे काय...तसंच एकर आणि हेक्टर म्हणजे काय हे शिकवा', अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटलांनी केली. तर ठाकरे सरकारनं केवळ कर्जमाफीचं गाजर दाखवलं, असा आरोप सुधीर मुनगंटीवारांनी केला.

पुण्यातील खेड तहसील कार्यालयासमोर धरणे

महाविकास आघाडी सरकारविरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येत असून पुणे जिल्ह्यातील खेड तालुका भाजपच्या वतीने खेड तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होण्याअगोदर नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यात त्यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 25000 रुपये नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, अशी घोषणा केली होती आता ते त्या पदावर आहेत. मात्र, अजूनही शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई मिळाली नाही. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू मात्र कित्येक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय, लवकरात लवकर सरकार ने कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्रांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तसंच तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत अशीही मागणी यावेळी करण्यात आले.

First published:

Tags: BJP, Osmanbad, Shivsena