अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या गुन्ह्यात फरार भाजप पदाधिकाऱ्याला अखेर अटक

अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या गुन्ह्यात फरार भाजप पदाधिकाऱ्याला अखेर अटक

>अल्पवयीन मुलीच्या अपहरणच्या गुन्ह्यात फरार असलेला भाजप पदाधिकारी राहुल चाबुकस्वार याला औरंगाबाद ग्रामीण गुन्हेशाखेच्या पोलिसांनी बुधवारी अखेर अटक केली.

  • Share this:

औरंगाबाद, 24 जून-अल्पवयीन मुलीच्या अपहरणच्या गुन्ह्यात फरार असलेला भाजप पदाधिकारी राहुल चाबुकस्वार याला औरंगाबाद ग्रामीण गुन्हेशाखेच्या पोलिसांनी बुधवारी अखेर अटक केली. शहरातील सिडको एन-4 भागातून राहुल चाबुकस्वार याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. राहुल चाबुकस्वारच्या विरोधात शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.

भाजप-एमआयएम कार्यकर्त्यांनी एकमेकांविरूद्ध उपसल्या होत्या तलवारी

लोकसभा निवडणुकीच्या काळात शहरातील पुंडलिकनगर परिसरातील हुसेन कॉलनीत भाजप आणि एमआयएम कार्यकर्त्यांत जुन्या वादातून तलवारी उपसण्यात आल्या होत्या. जोरदार सशस्त्र हाणामारी झाली. दोन गटात झालेल्या सशास्त्र हाणामारीत पंधरा जण जखमी झाले होते. पुंडलिकनगर पोलीस स्टेशनमध्ये परस्परविरोधात दंगल, खूनाचा प्रयत्न करणे आदी कलमानुसार गुन्हे नोंदविण्यात आले होते.

एमआयएमचे शहराध्यक्ष मून्शी पटेल आणि भाजपचा पदाधिकारी राहुल चाबुकस्वार यांच्यात जूना वाद आहे. त्यांच्यातील हा वाद गेल्या काही दिवसांपासून विकोपाला गेला आहे. कॉलनीतील तरूणांनी मोठ्या संख्येने आपल्यासोबत राहावे, यावरून पटेल आणि चाबुकस्वारमध्ये वाद आहे. राहुल चाबुकस्वार आणि रियाज शेख रहीम हे दोघे 23 मार्च रोजी रात्री घरात झोपले होते. अचानक त्यांच्या घराच्या खिडकीचा पडदा जळत होते. ते पाहण्यासाठी दोघे उठले असता आरोपी मुन्शी पटेल, अज्जू लाला, सरदार शफीक पटेल, फरहान कुरेशी, जुबेर अफसर पटेल, मोहसीन बागवान उर्फ लल्लायांच्यासह इतर आरोपींनी त्यांच्यावर सशस्त्र हल्ला केला होता. नंतर दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात पोलिसांत तक्रारी नोंदवल्या होत्या.

भाजपमध्ये गुन्हेगारांचे इनकमिंग

लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये गुन्हेगारांचे इनकमिंग सुरू झाल्याची टीका विरोधकांनी केली होती. लोकसभा निवडणुकीआधी औरंगाबादेत राहुल चाबुकस्वार याच्यासह अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. यात राहुल चाबूकस्वार याच्यासह अनेकांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचे समोर आले होते. दरम्यान, चाबूकस्वार यांनी आरोप फेटाळले होते. मला खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आले होते. दोन प्रकरणात निर्दोष सुटलो आहे. सामाजिक कार्याची आवड असल्याने आता भाजपमध्ये प्रवेश केल्याचे तेव्हा त्याने सांगितले होते.

भाजपच्या आमदाराची दादागीरी, पालिका कर्मचाऱ्याला बॅटने मारहाण

First published: June 26, 2019, 10:50 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading