यवतमाळ, 11 नोव्हेंबर : आमदार संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले होते. या आरोपांमुळे राठोडांना मंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. पण गेल्या दीड वर्षात पोलिसांच्या झालेल्या तपासात त्यांना क्लीन चीट मिळाल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील केला होता. संजय राठोडांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांना विरोध केला होता.
हे प्रकरण भारतीय जनता महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी लावून धरले होते. सध्या चित्रा वाघ या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणात प्रश्न विचारल्यावर चित्रा वाघ पत्रकारांवर भडकल्याचे पाहायला मिळाले. त्या पत्रकार परिषेदत बोलत होत्या.
नेमकं काय घडलं -
संजय राठोड प्रकरणी पत्रकारांनी चित्रा वाघ यांना प्रश्न विचारला. यानंतर मात्र, या प्रश्नावर चित्रा वाघ एका पत्रकारवर भडकल्या. "न्याय व्यवस्था है क्या आप? मै गई हु न्यायालय मे, आप मुझको मत सिखाये. असल्या पत्रकारांना बोलवू नका. सुपारी घेऊन प्रश्न विचारतात", असं म्हणत चित्रा वाघ पत्रकार परिषदेत भडकल्या.
हेही वाचा - शरद पवारांनी जादूटोणा केला, त्यामुळेच उद्धव ठाकरे'....; बावनकुळेंचा हल्लाबोल
काय आहे पूजा चव्हाण प्रकरण?
7 फेब्रुवारी 2021 ला पूजा चव्हाणनं पुण्यात राहत्या इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी शिवसेनेचे आमदार आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांचं नाव समोर आलं होतं. या प्रकरणानंतर संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. 28 फेब्रुवारीला संजय राठोड यांनी राजीनामा दिला. पूजा चव्हाण आत्महत्येचा पुणे पोलीस तपास करत आहेत. दरम्यान आता पुणे पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागले होते.
या पुराव्यात फोन रेकॉर्डिंग असून फोनवर बोलणारा व्यक्ती संजय राठोड असल्याचं सांगितलं जात आहे. फोनवरील संपूर्ण संभाषण बंजारा भाषेत आहे. आत्महत्येच्या पाच दिवस आधी पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्यात अनेकदा फोनवरुन संभाषण झालं होतं. हे कॉल पूजा चव्हाणच्या आत्महत्येच्या पाच-सहा दिवसांपूर्वीचे असल्याचा पुरावा पोलिसांना मिळाला आहे. 'द इंडियन एक्सप्रेस'ने यासंदर्भातील वृत्त दिलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chitra wagh, Maharashtra News, Sanjay rathod