Home /News /maharashtra /

गडचिरोलीत 'कमळ' उमलले, 3 ग्रामपंचायतीवर फडकला भाजपचा झेंडा

गडचिरोलीत 'कमळ' उमलले, 3 ग्रामपंचायतीवर फडकला भाजपचा झेंडा

मतमोजणीच्या निकालात सुरुवातीला महाविकास आघाडीने बहुतांश ठिकाणी बाजी मारल्याचे चित्र आहे

गडचिरोली, 22 जानेवारी : गडचिरोलीमध्ये  (Gadchiroli) दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतीसाठी  (gram panchayat election result 2021 ) मतमोजणी सुरू आहे.  एकूण 350 ग्राम पंचायतीचा निकाल थोड्यात वेळात स्पष्ट होणार आहे. महाविकास आघाडी पाठोपाठ आता भाजपने आपले खाते उघडले आहे. मतमोजणीच्या निकालात सुरुवातीला महाविकास आघाडीने बहुतांश ठिकाणी बाजी मारल्याचे चित्र आहे. तर दोन ग्रामपंचायतीवर भाजपने झेंडा फडकावला आहे. बोरी आणि राजापूर ग्राम पंचायतीमध्ये भाजपची सत्ता आली आहे. त्याचबरोबर तळोधी ग्राम पंचायतीवर भाजपची सत्ता आली आहे. तर दुसरीकडे अहेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि आदिवासी विद्यार्थी संघटना यांच्यात लढत झाली असून अहेरी तालुक्यात देवलमर्री जिमलगट्टा मरपल्ली या मोठ्या ग्रामपंचायतीची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली आहे. तर सिरोंचा तालुक्यातील वेंकटापुर या मोठया ग्रामपंचायतीसह नारायणपुर ग्राम पंचायतची सत्ता आदिवासी विद्यार्थी संघटनेकडे गेली आहे. चामोर्शी तालुक्यात मोठी ग्राम पंचायत असलेल्या कुनघाडा ग्राम पंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. तर देसाईगंज तालुक्यातही बहुतांश ग्राम पंचायती महाविकास आघाडीकडे गेल्या आहेत. दरम्यान, ग्राम पंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस पाहण्यास मिळाली. भाजपच्या नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वात जास्त गावात भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी झाले असल्याचा दावा केला आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा सर्वात जास्त ग्रामपंचायतीवर आम्हीच बाजी मारली असल्याचा दावा केला आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Gram panchayat

पुढील बातम्या