धुळे विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपची बाजी, महाविकास आघाडीचा पहिला पराभव

धुळे विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपची बाजी, महाविकास आघाडीचा पहिला पराभव

धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषद पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपचे उमेदवार अमरीश पटेल मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहे.

  • Share this:

धुळे, 03 डिसेंबर : धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषद पोटनिवडणुकीत (Dhule Legislative Council by-election)भाजपने (BJP) बाजी मारली आहे. भाजपचे उमेदवार अमरीश पटेल (Amrish Patel) मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहे. अमरीश पटेल यांच्या विजयाची फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे. अमरीश पटेल यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव केला आहे.

धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधान परिषद पोट निवडणुकीची मतमोजणी पार पडली आहे. भाजप उमेदवार अमरीश पटेल यांना 332 मतं तर महाविकास आघाडीच्या उमेदवार अभिजीत पाटील यांना 98 मतं पडली आहे.

1 जानेवारीपासून बदलणार FASTagचे नियम, सुरू होणार खास सर्व्हिस

437 पैकी 434 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. या निवडणुकीसाठी  99. 31 टक्के मतदान झाले होते. या पोटनिवडणुकीत  भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत होती.  भाजपकडून अमरीश पटेल तर महाविकास आघाडीकडून अभिजीत पाटील निवडणूक रिंगणात  होते. त्यामुळे ही थेट लढत कोण जिंकणार अशी उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मतमोजणीत 4 मतं बाद करण्यात आली आहे. उरलेल्या 430 मतांची मोजणी पूर्ण झाली आहे.   216 प्रथम प्राधान्याची मतं घेणार उमेदवार जिंकणार असा कल होता.

मुंबईतील फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये लग्न सोहळ्यात गायिकेचा संशयास्पद मृत्यू

पण, मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर मतदारांचा कौल हा भाजपचे उमेदवार अमरीश पटेल यांना मिळाला. तब्बल 332 मिळवून अमरीश पटेल यांनी मोठ्या मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्या स्थानिक निवडणुकीला सामोरं जात असून पहिल्याच निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे.

महिलांना ‘लाईनवूमन’ होण्याचा मार्ग मोकळा, हाय कोर्टाचे महत्वपूर्ण निर्देश

दरम्यान, शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचाही आज निकाल लागणार आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतदारसंघनिहाय औरंगाबाद पदवीधर 61.08 टक्के, पुणे पदवीधर 50.30 टक्के, नागपूर पदवीधर 54.76 टक्के, अमरावती शिक्षक मतदारसंघ 82.91 टक्के, पुणे शिक्षक मतदारसंघ 70.44 टक्के तर धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात सुमारे 99.31 टक्के मतदान झाले. त्यामुळे मतदारांचा कौल कुणाला मिळणार हे पाहण्याचे ठरणार आहे.

Published by: sachin Salve
First published: December 3, 2020, 9:30 AM IST
Tags:

ताज्या बातम्या