Home /News /maharashtra /

शिवसेनेच्या मदतीने भाजपने फडकावला झेंडा, महाविकासआघाडी पराभूत!

शिवसेनेच्या मदतीने भाजपने फडकावला झेंडा, महाविकासआघाडी पराभूत!

नाशिक जिल्हा परिषदेची सत्ता हातातून गेल्यानंतर आता कोल्हापूर जिल्हा परिषदेतही भाजपला फटका बसला आहे. महाविकास आघाडीला तिथे सत्ता मिळाली आहे

    असिफ मुरसल, प्रतिनिधी सांगली, 02 जानेवारी :  राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेनं भाजपला बाजूला सारत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली. परंतु, स्थानिक निवडणुकीत पुन्हा एकदा सेनेच्या मदतीनेच भाजपने आपली सत्ता कायम राखली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सांगली जिल्हापरिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपने आपला गड राखला आहे. शिवसेना आणि रयत क्रांतीच्या  मदतीने भाजपने सांगलीत आपला गड राखला आहे. आज झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी भाजपच्या प्राजक्ता कोरे यांनी  महाविकास आघाडीच्या उमेदवार कलावती गौरगोड यांचा 13 मतांनी पराभव करीत भाजपचा झेंडा फडकावला आहे. तर उपाध्यक्षपदी भाजपचेच शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांचा विजय झाला आहे. सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत शिवसेना आणि रयत क्रांती भाजपसोबत गेल्याने सांगली जिल्हा परिषदेत भाजपने बाजी मारली आहे. त्यामुळे सत्तेची स्वप्नं पाहणाऱ्या महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं. सांगली जिल्हा परिषद पक्षीय बलाबल -एकूण 60 जागा एक जागा रिक्त एकूण - मतदान 57 भाजप - 24 + 2 अपक्ष = 26 शिवसेना - 3 रयत आघाडी - 4 घोरपडे गट - 2 भाजप मतदान - एकूण 35 राष्ट्रवादी - 14 काँग्रेस- 7 स्वाभिमानी - 1 आघाडी मतदान एकूण - 22 भगवान वाघमारे - राष्ट्रवादी गैरहजर शारदा पाटील - काँग्रेस गैरहजर पंचायत समिती सभापती निवडणुकीत 52 ठिकाणी भाजपला यश दरम्यान, राज्यात पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष 52 पंचायत समित्यांमध्ये यश मिळवून पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. अन्य पक्ष याबाबतीत भाजपापेक्षा खूप मागे राहिले आहेत. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. राज्यातील पंचायत समिती सभापतीपदाच्या निवडणुकांच्या आतापर्यंत हाती आलेल्या निकालांमध्ये भाजपा 52 पंचायत समित्यांमध्ये यश मिळवून पहिल्या स्थानावर आहे. याखेरीज सात पंचायत पंचायत समित्यांमध्ये भाजपाला इतरांसोबत आघाडी करून यश मिळाले आहे. भाजपाशी स्पर्धा करणारे राष्ट्रवादी, काँग्रेस (34 पंचायत समित्या), शिवसेना (31 पंचायत समित्या) आणि काँग्रेस (23 पंचायत समित्या) हे पक्ष मागे पडले आहेत. ग्रामीण भागात भाजपच भक्कम असल्याचं या निकालातून दिसून आले आहे. चंद्रकांत पाटलांच्या जिल्ह्यात भाजप सपाट! दरम्यान, नाशिक जिल्हा परिषदेची सत्ता हातातून गेल्यानंतर आता कोल्हापूर जिल्हा परिषदही भाजपच्या हातातून गेली असून महाविकास आघाडीला तिथे सत्ता मिळाली आहे. भाजपचे दिग्गज नेते चंद्रकांत पाटील यांना हा मोठा धक्का मानला जातोय. या नव्या समिकरणामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता आता संपुष्टात आली. दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेने आपले सदस्य सहलीवर नेले होते तर भाजप आणि महाडिक गटाचे सदस्यही सहलीवर होते. दोन्हीकडचे सदस्य जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाल्यानंतर निवडीमध्ये अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. काँग्रेसचे बजरंग पाटील यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी चे सतीश पाटील यांची निवड झालीय. नाशिकही हातातून गेलं नाशिक जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदी शिवसेनेच्या बाळासाहेब क्षीरसागर निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सयाजी गायकवाड यांना संधी मिळाली आहे. महाविकास आघाडीच्या झंझावातासमोर भाजपने दोन्ही पदांसाठी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: BJP, Sangli

    पुढील बातम्या