गिरीश महाजनांनी 'करून दाखवलं', जामनेर नगरपालिकेवर भाजपचा झेंडा !

गिरीश महाजनांनी 'करून दाखवलं', जामनेर नगरपालिकेवर भाजपचा झेंडा !

भाजपने व्हाईटवाॅश देत सर्वच जागा पटकावल्यात. विशेष म्हणजे, विजयी उमेदवारांमध्ये 7 मुस्लिम उमेदवार आहे.

  • Share this:

जळगाव, 12 एप्रिल : जामनेर नगरपालिकेत जलसंधारण मंत्री गिरीश महाजन आपला गड कायम राखत भाजपचा झेंडा फडकावलाय. भाजपने व्हाईटवाॅश देत सर्वच जागा पटकावल्यात. विशेष म्हणजे, विजयी उमेदवारांमध्ये 7 मुस्लिम उमेदवार आहे.

जामनेर नगरपालिकेच्या 25 जागांसाठी आज मतमोजणी झाली. भाजपने सर्वच्या सर्व 25 जागा जिंकत झेंडा फडकावलाय. जलसंधारण मंत्री गिरीश महाजन यांचा मतदारसंघ आहे. सर्व 25 जागा भाजपचे उमेदवार विजयी झालेत. विशेष म्हणजे त्यातले 7 उमेदवार मुस्लीम आहेत. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आणि गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन जवळपास 9 हजार मतांनी विजयी झाल्यात. गिरीश महाजन यांनी सर्व पक्षांना धोबीपछाड दिलाय.

जामनेर निवडणूक वेगळी कशी ?

जामनेर सारख्या मुस्लीम बहुल भागात भाजपला जनाधार नव्हता. त्यामुळे  भाजपला मुस्लिम उमेदवार मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागायचे. यंदा मात्र चित्र पूर्ण पालटलं.  यंदा भाजपचे 7 मुस्लीम उमेदवार विजयी झाले. जात,धर्म,पंथ यापलीकडे जाऊन ही निवडणूक झाली. या निवडणुकीत फक्त विकास हा मुद्दा होता. गिरीश महाजन मंत्री झाल्यानंतर, शहरात झपाट्यानं अनेक कामं होताय.

आरोग्यधाम गाव म्हणून जामनेरची नवी ओळख मिळालीये.  भाजपचा विजयी निकाल म्हणजे, नगराध्यक्षा साधना महाजन यांच्या स्वतंत्र धडाकेबाज कामाची पावती दिलीये.  कार्यक्षम महिला लोकप्रतिनिधी म्हणून साधना महाजन यांची स्वतंत्र ओळख आहे.

विशेष म्हणजे यावेळी मतदानात मुस्लीम महिलांचं लक्षणीय मतदान झालं होतं.  या सर्व भागात भाजपला 85 टक्के मतदान झालं होतं. त्यामुळे भाजपचा विजय हा निश्चित होता.

First published: April 12, 2018, 6:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading