शिवसेना आणि राष्ट्रवादीचा गेम ठरला फेल, भाजपकडेच तिजोरीच्या चाव्या!

शिवसेना आणि राष्ट्रवादीचा गेम ठरला फेल, भाजपकडेच तिजोरीच्या चाव्या!

स्थायी ताब्यात घेण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेनं तर चक्क पाठ फिरवली. या निवडणुकीत शिवसेनेचे पाच सदस्य सभागृहात आलेच नाही.

  • Share this:

नाशिक, 09 मार्च : नाशिक महापालिकेची (Nashik Municipal Corporation) अर्थ सत्ता पुन्हा राखण्यात सत्ताधारी भाजपला (BJP) यश मिळालं आहे. सातत्यानं स्थायी ताब्यात घेण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेला (Shivsena) मात्र चांगलंच बॅकफूटवर जावं लागलं तर सेनेसोबत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीलाही (NCP) आपल्या तलवारी म्यान कराव्या लागल्या.

विरोधकांनी अनेक प्रयत्न करूनही आपआपसातील एकोप्या अभावी नाशिक महापालिकेची स्थायी समिती आपल्याच ताब्यात ठेवण्यात सत्तारुढ भाजपला यश आलंय. खरंतर गेल्या काही दिवसात, पालिकेचं राजकारण जोरात तापले आहे. कारण लवकरच होऊ घातलेली पालिकेची निवडणूक. स्वबळाची भाषा तर प्रत्येक राजकीय पक्ष करतोय. पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोणत्याही परिस्थितीत, पालिका राष्ट्रवादीच्या ताब्यात आणायची आहे तर शिवसेना अत्यंत आक्रमक हालचाली करत आह.

संजनाची ही ट्विट सांगतायत 'लव्ह स्टोरी', यॉर्कर किंग बुमराह क्लीन बोल्ड!

भाजपचे वसंत गीते आणि सुनील बागुल या 2 बड्या नेत्यांनी शिवसेनेत केलेला प्रवेश, खासदार संजय राऊत यांचे सातत्यानं होणारे दौरे आणि याच पार्श्वभूमीवर आलेली स्थायीची निवडणूक. त्यामुळे महाविकास आघाडी पॅटर्न राबवून स्थायी ताब्यात घेण्यासाठी सेनेनं रणनीती तर आखली. मात्र मनसेला तंबूत घेण्यात त्यांना अपयश आलं. छगन भुजबळ यांचा करिश्माही अपयशी ठरला. भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजन यांनी केलेल्या वेगवान हालचाली,जमवून घेण्याची हातोटी  ही सर्वच विरोधकांना चक्रावून टाकणारी ठरली.

अखेर पुन्हा एकदा स्थायी समिती,अत्यंत महत्वाच्या कालावधीसाठी ताब्यात राखण्यात भाजपला यश आले आणि मनसे-भाजप हा नवा पॅटर्न चक्क खुल्या पद्धतीनं समोर आला. अर्थात, ही निवडणूक येत्या पंचवार्षिक निवडणुकीची नांदी मानली जात आहे. अखेर सभापतिपदी भाजपचे गणेश गीते यांची अपेक्षेनुसार बिनविरोध निवड झाली. जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवडणुकीत गीते यांचा एकमेव अर्ज असल्यानं,त्यांची बिनविरोध निवड ही निश्चितच होती.

Alert! 'या' स्मार्टफोनमध्ये बंद होऊ शतकं WhatsApp, जाणून घ्या काय आहे कारण

स्थायी ताब्यात घेण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेनं तर चक्क पाठ फिरवली. या निवडणुकीत शिवसेनेचे पाच सदस्य सभागृहात आलेच नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह  भाजपला समर्थन करणाऱ्या मनसेचे सदस्य मात्र उपस्थित होते. गीते यांचा एकमेव अर्ज असल्याने अखेरीस जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी गीते यांची निवड झाल्याचे घोषित केले. स्थायी समितीच्या 16 सदस्यांपैकी 8 सदस्य असून मनसेने भाजपला पाठिंबा दिला त्यामुळे अडचण नव्हती. परंतु, शिवसेनेने सुरुवातीला प्रतिष्ठेचा प्रश्न केला पण अन्य विरोधकांनी साथ दिली नाही.

त्यामुळे घोडेबाजार वाढत असल्याचे कारण देऊन शिवसेनेने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला होता. कारण काहीही असो,मात्र ऐन निवडणूक पार्श्वभूमीवर, स्थायीचा किल्ला भाजपने सर केला असला तरी येत्या दिवसात होणाऱ्या निवडणुकीचं घोडामैदान काही दूर नाही. आज जरी सत्तेत भाजप असली तरी महाविकास आघाडी म्हणून सर्व पक्ष भाजपला घेरण्याचा चक्रव्यूह आखण्याची तयारीला लागलेय. आता भाजप, हे चक्रव्यूहही भेदण्यात यशस्वी होणार का ? महाविकास आघाडी भाजपला मात देणार ? हा प्रश्न आज तरी अनुत्तरीत आहे.

Published by: sachin Salve
First published: March 9, 2021, 4:06 PM IST

ताज्या बातम्या