EXCLUSIVE : भाजपला स्वबळावरही बहुमत मिळेल- अमित शहांचा दावा

News18 ला दिलेल्या EXCLUSIVE मुलाखतीत भाजप पक्षाध्यक्षांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार याचेही संकेत दिले. शिवसेनेच्या युतीबद्दल ते काय म्हणाले वाचा...

News18 Lokmat | Updated On: Oct 17, 2019 08:27 AM IST

EXCLUSIVE : भाजपला स्वबळावरही बहुमत मिळेल- अमित शहांचा दावा

नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर : महाराष्ट्रात भाजप -शिवसेना युतीला बहुमत मिळेल यात शंका नाही. पण भाजपला स्वबळावरसुद्धा बहुमत मिळेल, असा दावा अमित शहा यांनी केला आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची विशेष मुलाखत News18 चे मुख्य संपादक राहुल जोशी यांनी घेतली.  या EXCLUSIVE मुलाखतीत भाजप पक्षाध्यक्षांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार याचेही संकेत दिले.

महाराष्ट्रात सेनेबरोबर युती असली तरी मुख्यमंत्रिपद आमचंच असेल, असंही शहा यांनी स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय मात्र त्यांनी राज्याच्या नेत्यांवर सोपवला. देवेंद्र फडणवीस यांची टीम उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. फडणवीसांवर एवढी मोठी जबाबदारी टाकताना त्यांनी पुढचा मुख्यमंत्री कोण याचेही संकेत दिले. आमचं ठरलंय, असा दावा करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं नेमकं काय ठरलं होतं, हे आता स्पष्ट होत आहे.

News18 ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अमित शहा यांनी इतरही बऱ्याच मुद्द्यांवर चर्चा केली. या मुलाखतीतले प्रमुख मुद्दे :

- पश्चिम बंगालमध्ये पुढच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला दोन तृतीयांश बहुमत मिळू शकतं.

- भाजपच्या यशाचं प्रमाण पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे वेगवेगळं असलं, तरी प्रत्येक ठिकाणी भाजपने आपला रस्ता निश्चित केला आहे.

Loading...

वाचा - उद्धव ठाकरेंनी केलेल्या जहरी टीकेवर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया

- जम्मू काश्मीरमध्ये प्रशासनाच्या मदतीने पुढच्या 15 वर्षांच्या विकासाची ब्लू प्रिंट तयार केली आहे.

- मॉब लिंचिंग पूर्वीसुद्धा होत होतं. आपल्याला तो एक सामाजिक प्रश्न म्हणून सोडवायचा आहे की, त्याचं राजकारण करायचं आहे?

वाचा ...त्यापेक्षा मी मेलेलं बरं, उदयनराजेंचा 'त्या' वक्तव्यावर संतप्त खुलासा

- हिंदी दिवस - हिंदीच्या आग्रहाबद्दल माझ्या भाषणाचा गैरअर्थ काढण्यात आला. मी इंग्रजीऐवजी हिंदीचा वापर असं म्हणालो होतो. आमचं धोरण स्थानिक भाषांना प्रोत्साहन देण्याचंच आहे.

- राम मंदिर - रामजन्मभूमीबद्दल सुप्रीम कोर्ट जो काही निर्णय देईल, त्याचा आदर केला जाईल.

----------------------------------------

UNCUT भाषण - राणे म्हणजे पाठीत वार करणारी औलाद, उद्धव ठाकरेंचं घणाघाती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2019 08:27 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...