नितेश राणेंच्या उमेदवारीवर भाजप घेणार 'या' तारखेला निर्णय

नितेश राणेंच्या उमेदवारीवर भाजप घेणार 'या' तारखेला निर्णय

नितेश राणे यांनी ट्विट करत आता फक्त काही तास उरले आहेत. ही वादळापूर्वीची शांतता असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे राणे बंडाच्या पावित्र्यात आहेत का अशही चर्चा केली जातेय.

  • Share this:

सिंधुदुर्ग 02 ऑक्टोंबर : भाजपचे सहयोगी खासदार नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त अद्याप निघत नाहीये. आमदार नितेश राणे यांना भाजपकडून कणकवलीतून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे. मात्र याचा अंतिम फैसला 4 तारखेला होणार आहे. सिंधुदुर्ग भाजपा कोअर कमिटीची तातडीची  बैठक बुधवारी झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला. कणकवली विधानसभेचा उमेदवार 4 तारीखला ठरणार असल्याचं भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी सांगितलं. कणकवलीसाठीचा AB फॉर्म भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे असंही त्यांनी सांगितलं. या बैठकीत नितेश राणेंच्या उमेदवारीवर चर्चा झाली. अंतिम निर्णय 4 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता होईल  असंही ते म्हणाले.

हे पैसे कुणाचे? निवडणुकीचा माहोल, गुजरात मेलमधून तब्बल साडे सात कोटी जप्त

नितेश राणे यांनी ट्विट करत आता फक्त काही तास उरले आहेत. ही वादळापूर्वीची शांतता असल्याचं ट्विट केलं होतं. त्यामुळे राणे बंडाच्या पावित्र्यात आहेत का अशही चर्चा केली जातेय. तर राणेंना वेटिंग लिस्टवर ठेवण्याचं कारण भाजपने अजुन स्पष्ट केलेलं नाही. योग्य वेळी निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी या आधी स्पष्ट केलं होतं.

'सपा'शी फाटता फाटता जुळलं, काँग्रेस-राष्ट्रवादीचं जागावाटपाचं घोडं अजुन अडलेलंच

खडसेंचाही पत्ता कट

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घटना घडत आहेत. भाजपच्या दुसऱ्याही यादीत ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं नाव नाही अशी माहिती सूत्रांनी दिलीय. भाजपच्या पहिल्या यादीत खडसे यांचं नाव नव्हतं. मात्र दुसऱ्या यादीत नाव येईल असंही बोललं जात होतं. मात्र दुसऱ्या यादीत नाव नसल्याने त्यांचा पत्ता कट होणार हे निश्चित समजलं जातंय. खडसेंच्या ऐवजी त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय.

आदित्य ठाकरेंचा 'केम छो'च्या डावावर विरोधकांचा 'मराठी' बाणा... असं रंगलं राजकारण

2014च्या निवडणुकीनंतर खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना डावलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर झालेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपानंतर खडसे यांना राजीनामा द्यावा लागला होता. आपल्याला तिकीट नाकारणार असल्याचा अंदाज आल्यानेच खडसे यांनी मंगळवारी आपला अर्ज दाखल केला होता. नंतर झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी आपली दु:ख व्यक्त केलं होतं.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 2, 2019, 9:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading